धार्मिक भेदाला छेदणारी ‘सिध्द’ स्वरानुभूती! मजहरच्या‘सिध्दीविनायक’गाण्याला यु ट्यूबवर भरभरून पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 11:00 PM2020-01-06T23:00:00+5:302020-01-06T23:00:02+5:30

मला लहानपणापासून घरातून सर्वधर्मसमभावाचे संस्कार मिळाले....

ganesh song hit on you tube who singing by muslim youth ! | धार्मिक भेदाला छेदणारी ‘सिध्द’ स्वरानुभूती! मजहरच्या‘सिध्दीविनायक’गाण्याला यु ट्यूबवर भरभरून पसंती

धार्मिक भेदाला छेदणारी ‘सिध्द’ स्वरानुभूती! मजहरच्या‘सिध्दीविनायक’गाण्याला यु ट्यूबवर भरभरून पसंती

Next
ठळक मुद्देमजहर सिद्दीकीचा संगीत प्रयोग : गणपतीच्या ५३ नावांचा गाण्यात समावेशईद, बकरी ईद, दिवाळी, होळी असे सर्व सण आम्ही सर्वजण एकत्र मिळून साजरे करतो

प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : संगीत...जे मनाला भावतं आणि ह्रदयाचा ताबा घेतं! भाषिक, प्रादेशिक सीमा ओलांडून सुरांची जादू सर्वांना आपलीशी करते. संगीतातून मिळणारी स्वरानुभूती कोणताच भेदाभेद मानत नाही. मजहर सिद्दीकी या २४ वर्षीय तरुणाने सुरांचा आनंददायी ठेवा रसिकांसाठी आणला आहे. गणपतीची ५३ नावे समाविष्ट करुन त्याने ‘सिध्दीविनायक’ हे गाणे सरहद म्युझिकच्या सहाय्याने संगीतबध्द केले आहे. यूट्यूबर या गाण्याला रसिकांची भरभरुन पसंती मिळत आहे.
‘मी मजहर सिद्दीकी...भारतीय मुस्लिम असल्याचा मला अभिमान आहे. मला लहानपणापासून घरातून सर्वधर्मसमभावाचे संस्कार मिळाले. कुराण शरीफबरोबरच भगवतगीतेचे शिक्षणही मिळाले. मी ६ वर्षांचा असताना वडील मला शहरातील अनेक मंदिरांमध्ये घेऊन जायचे. त्यामुळे कीर्तन, प्रवचन ऐकण्याची आवड तेव्हापासूनच माझ्यात रुजली. मी स्वत:ही मंदिरांमध्ये भजन गायचो. ईद, बकरी ईद, दिवाळी, होळी असे सर्व सण आम्ही सर्वजण एकत्र मिळून साजरे करायचो. सरहद म्युझिकच्या माध्यमातून मी ‘सिध्दीविनायक’ हे गणपती नामावलीचे गीत संगीतबध्द करुन गाण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये गणेशाच्या १०८ नावांपैकी ५३ नावांचा समावेश करण्यात आला आहे’, अशी माहिती मजहरने ‘लोकमत’शी बोलताना दिली.
मजहर काश्मीरी संगीतामध्ये विविध प्रयोग करु पाहत आहे. काश्मीरी लोकगीते पुनरुज्जीवित व्हावीत, यासाठी तो प्रयत्न करत आहे. आजवर त्याने जुन्या लोकगीतांना सुरांचा नवा साज चढवून गाणी संगीतबध्द केली आहेत. काश्मीरी लोकांबद्दल लोकांच्या मनात बरेच गैरसमज आहेत. एकमेकांच्या परंपरा, सकारात्मक बाजू माहीत नसल्याने बरेचदा गैरसमज वाढतात. संगीताच्या माध्यमातून प्रादेशिक दरी भरली जावी, लोक एकमेकांच्या जवळ यावेत आणि संवादाचे पूल बांधले जावेत, असा मानस मजहर सिद्दीकी याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
बालगणपती, भालचंद्र, बुध्दिनाथ, एकाक्षर, गजकर्ण, एकदंत, गजानन, गौरीसूत, लंबोदर, महागणपती, मंगलमूर्ती, सिध्दीविनायक अशा अनेक नावांचा समावेश करण्यात आला आहे. २ जानेवारीला हे गाणे सादर करण्यात आले. यूट्यूबवर या व्हिडिओला हजारो हिटस मिळत आहेत आणि संगीतप्रेमींच्या पसंतीस उतरत आहे.  
---------
मी मुळचा लखनऊचा आहे. एक-दीड वर्षापूर्वी मी पुण्यात आलो आणि अनेक काश्मीरी तरुणांना भेटलो. मी चार-पाच वर्षांपासून काश्मीरी संगीतावर काम करत आहे. लहानपणापासून घरात गाण्याला अनुकूल वातावरण असल्याने माझी संगीताची आवड जोपासली गेली. वडील मंदिरांमध्ये कीर्तन, प्रवचन ऐकायला घेऊन जायचे. मराठी मित्र असल्यामुळे मराठी गाण्यांचीही गोडी लागली. गणपती ही बुध्दीची देवता मानली जाते. त्यामुळे हे गाणे संगीतबध्द करण्याचा निर्णय घेतला.
- मजहर सिद्दीकी
----------------
एकमेकांच्या धार्मिक सणांमध्ये आपण उत्साहाने सहभागी होतो. अनेक मंडळांचे अध्यक्षही मुस्लिम आहेत. सध्याचा काळ धार्मिक धु्रवीकरणाचा आहे. समाजातील, लोकांमधील विखार वाढत असताना, प्रादेशिक, धार्मिक अस्मिता टोकदार होत असताना संगीताच्या माध्यमातून सर्वांना जोडण्याचा हा प्रयत्न सकारात्मक आहे. देशभरात संगीतामध्ये होत असलेले प्रयोग दर आठवड्याला यूट्यूब सादर करणार केले जाणार आहेत.
- संजय नहार, संस्थापक, सरहद

Web Title: ganesh song hit on you tube who singing by muslim youth !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.