ौद्योगिक वसाहतीत खंडणी मागणारा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:14 AM2021-01-19T04:14:50+5:302021-01-19T04:14:50+5:30

संतोष मधुकर मांजरे (वय २९, रा. कोरेगाव खुर्द, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह नारायण घावटे ...

Gajaad seeking ransom in an industrial estate | ौद्योगिक वसाहतीत खंडणी मागणारा गजाआड

ौद्योगिक वसाहतीत खंडणी मागणारा गजाआड

Next

संतोष मधुकर मांजरे (वय २९, रा. कोरेगाव खुर्द, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह नारायण घावटे (रा. शेलू, ता. खेड), सोन्या (पूर्ण नाव-पत्ता माहिती नाही) आणि अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विजय शिवाजी राऊत (वय ३१, रा. भांबोली, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदानंद मोल्ड अँड टूल्स प्रा. लि. या कंपनीच्या डेव्हलपिंगचे काम फिर्यादी राऊत यांच्याकडे आहे.

आरोपी संतोष याने बेकायदेशीर गर्दी जमवून राऊत यांना कंपनीतील डेव्हलपिंगचे काम मला पाहिजे, असे म्हणत महिन्याला ५० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. खंडणी न दिल्यास तसेच पोलिसांना सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती. फिर्यादीने नकार दिल्याने आरोपीने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खुर्ची फेकून मारली होती. यानंतर आरोपी फरार झाले होते. गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी मांजरे हा कुरकुंडी गावाकडून कोरेगाव खुर्द गावाकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी भाम नदीवर सापळा लावला. नदीच्या पुलावर आल्यानंतर मांजरेला पोलिसांची चाहूल लागली. तो गाडीतून उतरून उसाच्या शेतात पळून गेला. पोलिसांनी शेताला घेराव घालून त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि त्यात सहा जिवंत काडतुसे आढळली. त्याच्या कारची झडती घेतली असता त्यात तीन कोयते आणि एक तलवार आढळून आली. पोलिसांनी सर्व शस्त्रसाठा जप्त करून मांजरे याला अटक केली.

संतोष मांजरे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने २०१३ साली दोन व्यक्तींचा कोयत्याने वार करून निर्घृण खून केला होता. त्यात त्याला अटक झाली होती. सन २०१९ पर्यंत तो येरवडा कारागृहात होता. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा गुन्हेगारीचे सत्र सुरू केले. पोलिसांनी त्याची पुन्हा कारागृहात रवानगी केली आहे.

मांजरे याच्यावर पूर्वी दोन खुनाचे गुन्हे, दोन बेकायदा हत्यार बाळगण्याचे पूर्वी गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर आणखी दोन गुन्ह्यांची भर पडली आहे.

Web Title: Gajaad seeking ransom in an industrial estate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.