एफटीआयआयमध्ये बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही : संचालकांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 07:15 PM2019-02-16T19:15:25+5:302019-02-16T19:16:46+5:30

कोणत्याही विद्यार्थ्याने प्राध्यापकांचा अपमान करणे किंवा त्यांना धमकी देणे यागोष्टी कदापि खपवून घेतल्या जाणार नाहीत असा इशारा दिला आहे. 

FTII will not be intimidated undiscipline : Director's alert | एफटीआयआयमध्ये बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही : संचालकांचा इशारा

एफटीआयआयमध्ये बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही : संचालकांचा इशारा

googlenewsNext
ठळक मुद्देदोन विद्यार्थ्यांमधील एका विद्यार्थ्यावर तक्रार समितीने कडक कारवाई करण्याच्या सूचना

पुणे : एफटीआयआयमधील निलंबित विद्यार्थ्याला हॉस्टेलमधून काढून टाकल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरूद्ध आंदोलनाचे शस्त्र उगारले असून, संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर  ह्ँव थ्रोन अस असा फलक लावून ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मात्र संचालकांनी विद्यार्थ्यावर केलेल्या कारवाईचे समर्थन केले असून, कोणत्याही विद्यार्थ्याने प्राध्यापकांचा अपमान करणे किंवा त्यांना धमकी देणे यागोष्टी कदापि खपवून घेतल्या जाणार नाहीत असा इशारा दिला आहे. 
    एफटीआयआयच्या विद्यार्थी संघटनेने निलंबित विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शविला असून, प्रशासनाची कारवाई चुकीचे असल्याचे म्हटले आहे. संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांचे स्टुडिओ प्रात्यक्षिक असते. जे अत्यंत गरजेचे आहे. मात्र त्याच्या नियम आणि अटी काय आहेत हे विद्यार्थ्यांना माहिती नव्हते.आर्ट अँंड डायरेक्शन अधिष्ठातांनाही त्याची कल्पना नव्हती. त्यामुळे अधिष्ठातांशी थोडा वाद झाला, अधिष्ठातांनी विभागप्रमुखांना वादाबददल सांगितले आणि त्यांनी संचालकांकडे दोन विद्यार्थ्यांची तक्रार केली. त्यानंतर तक्रार समिती जोपर्यंत गठीत होत नाही तोवर दोन विद्याथर््यांना निलंबित करण्यात येत आहे अशी नोटीस काढली. त्यानंतर विभागप्रमुख आणि अधिष्ठाताशी दोनदा बैठका झाल्या. विभागप्रमुख निलंबन मागे घेण्यास तयार होते; मात्र प्रशासनाचा दबाव असल्यामुळे त्यांनी असमर्थता दर्शविली. त्यामुळे दोन विद्यार्थी नैराश्यात गेले. त्यातला एक विद्यार्थी निघून गेला. आम्ही विभागप्रमुखांना सांगितल्यावर तक्रार समिती स्थापन केली, त्यांनी आपला रिपोर्ट दिला. त्यामध्ये विद्यार्थी मोठ्या आवाजात बोलले असा उल्लेख केला असला तरी शैक्षणिक काही प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे यांचा राग योग्य आहे.विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीकडे लक्ष द्यावे असे म्हटले आहे. मात्र, अचानक त्यातील एका विद्यार्थ्याला हॉस्टेलमधून काढून टाकले आहे. त्या विद्यार्थ्याची कौटुंबिक परिस्थिती बिकट आहे. हॉस्टेलमधून काढून टाकले तर बाहेर राहाण्यासाठी पैसे नाहीत. अशा परिस्थितीत त्याला शिक्षण सोडावे लागण्याची शक्यता स्टुडंट असोसिएशनचा सचिव राजर्षी मुजुमदार याने लोकमतशी व्यक्त केली आहे. मात्र संस्थेचे संचालक भूपेंद्र कँथोला यांनी कारवाईचे समर्थन केले आहे. कोणत्याही विद्याथर््याने प्राध्यापकांचा अपमान करणे किंवा त्यांना धमकी देणे यागोष्टी कदापि संस्थेत खपवून घेतल्या जाणार नाहीत अशी पुनरोक्ती दिली. 
--------------------------------------------------------
दोन विद्यार्थ्यांमधील एका विद्यार्थ्यावर तक्रार समितीने कडक कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याच्यावर यापूवीर्ही तीनदा बेशिस्तीची कारवाई केली आहे. त्यामुळे एफटीआयआय प्रशासनाने एकाला हॉस्टेल सोडण्यास सांगितले आहे. याची त्या विद्यार्थ्यला पूर्वसूचना दिली होती. संस्थेतील काही विद्यार्थी नेते त्या दोषी विद्यार्थ्यांना माफी मागण्याचा सल्ला देण्याऐवजी त्यांना आंदोलन करण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत. कोणत्याहीविद्यार्थ्याने प्राध्यापकांचा अपमान करणे किंवा त्यांना धमकी देणे यागोष्टी कदापि संस्थेत खपवून घेतल्या जाणार नाहीत.- भूपेंद्र कँथोला, संचालक एफटीआयआय

Web Title: FTII will not be intimidated undiscipline : Director's alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.