संयुक्त प्रवेश परीक्षा एक प्रकारचा घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 02:57 PM2019-12-18T14:57:57+5:302019-12-18T15:01:03+5:30

एफटीआयआय विद्यार्थी संघटनेचा आरोप

Fruad in Joint Entrance Examination of FTII | संयुक्त प्रवेश परीक्षा एक प्रकारचा घोटाळा

संयुक्त प्रवेश परीक्षा एक प्रकारचा घोटाळा

Next
ठळक मुद्दे १ कोटी ३८ हजार ६२२ रुपये इतका नफा कमावला प्रवेश परीक्षा शुल्काला विरोध करण्यामागची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद

पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) व सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एसआरएफटीआयआय) या दोन संस्थांच्या संयुक्त प्रवेशप्रक्रियेमधून यंदाच्या वर्षी १ कोटी ६८ लाख २३ हजार ६०० रुपये शुल्क विद्यार्थ्यांकडून संकलित झाले. या संयुक्त परीक्षेवर एफटीआयआयने  केवळ २९ लाख ६९ हजार ९७८ रुपये इतकाच खर्च केला. मात्र, या परीक्षेतून संस्थेने १ कोटी ३८ हजार ६२२ रुपये इतका नफा कमावला आहे. एखादी सरकारी शैक्षणिक संस्था व्यावसायिक नफा कमवू शकते का? ही संस्था म्हणजे सरकारचा व्यावसायिक ब्रँड आहे का? असे सवाल उपस्थित करीत, संयुक्त प्रवेश परीक्षा हा एक प्रकारचा घोटाळा असल्याचा आरोप एफटीआयआयच्या विद्यार्थी संघटनेने मंगळवारी केला. 
संघटनेतर्फे प्रवेश परीक्षा शुल्काला विरोध करण्यामागची भूमिका स्पष्ट करण्यासाठी मंगळवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. विद्यार्थ्यांना संस्थेमध्ये पत्रकारांशी बोलण्यास विरोध केला. माध्यमांना एकाच वेळी आत सोडण्यास मज्जाव केला होता. अविरत पाटील, रॉबिन जॉय, आदित व्ही., सात्विन, राजश्री मुजुमदार या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या प्रवेशद्वारावर येऊन पत्रकार परिषदेला संबोधित करणे पसंत केले. ‘एफटीआयआय इज अवर्स’, ‘आय अ‍ॅम अगेन्स्ट फी हाईक’असे फलक हातात घेऊन, जोरदार नारेबाजी करीत विद्यार्थी प्रवेशद्वारापाशी आले. ‘तू जिंदा है’, ‘हम होंगे कामयाब’ ही गाणी म्हणत विद्यार्थ्यांनी निषेधाला धार चढवली.
ते म्हणाले, ‘‘दोन्ही संस्थांनी संयुक्त प्रवेश परीक्षा घेण्यास गेल्या वर्षीपासून सुरुवात केली. एफटीआयआयला ५३ लाख  रुपयांचा नफा झाला होता. मात्र, या परीक्षेमधून यंदा संस्थेने तिप्पट नफा कमावला आहे. यंदाच्या वर्षासाठी दोन्ही संस्थांच्या संयुक्त परीक्षेसाठी प्रवेश शुल्क १० हजार रुपये निश्चित केले. 
या शुल्कवाढीविरोधात एफटीआयआयचे चार विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत, तर इतर विद्यार्थ्यांनी शुल्कवाढीचा निषेध केला आहे. परीक्षा शुल्कात वाढ केल्यामुळे  केवळ हे शुल्क परवडणाºया गटातील विद्यार्थीच परीक्षेला बसू शकतील. इतर वर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा देणे दुरापास्त होईल. दरम्यान, सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत निदर्शने करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली. मात्र, ती न मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले. 
पालकांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप! 
२०१९मध्ये एफटीआयआयमधील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा संस्थेतर्फे एक ग्रुप तयार करण्यात आला असून, त्यावर विद्यार्थ्यांबाबत सर्व गोष्टी पालकांना कळविण्यात येत असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. 
......
एफटीआयआयमध्ये प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे निषेध किंवा विरोधी आंदोलन करणार नाही, असे शपथपत्र द्यावे लागते. ते न दिल्यास प्रवेशप्रक्रिया पूर्ण होत नाही. जर एखादा विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाला, तर त्याला शिष्यवृत्ती, आंतरराष्ट्रीय आदानप्रदान कार्यक्रमांपासून वंचित ठेवले जाते. इतकेच काय, त्यांना ‘बोनाफाईड’ प्रमाणपत्रदेखील दिले जात  नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. 
....
 

Web Title: Fruad in Joint Entrance Examination of FTII

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.