तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 04:00 AM2020-11-30T04:00:02+5:302020-11-30T04:00:02+5:30

आव्हाळवाडी : वाघोली येथील बांधकाम व्यवसायिकाने ग्राहकाची फसवणूकप्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सचिन अरुण ...

Fraud case filed against three | तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Next

आव्हाळवाडी : वाघोली येथील बांधकाम व्यवसायिकाने ग्राहकाची फसवणूकप्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

सचिन अरुण सिद्धे यांनी वाघोली येथील अल्फा लॅन्ड मार्क प्रोजेक्ट (गट नं. ५) मधील ए. विंग मध्ये २०१४ मध्ये फ्लॅट बुक केला होता. त्यानुसार बांधकाम व्यवसायिक नितीन प्रेमबेल्लरा (संचालक), अविनाश रमेश कटनहार (संचालक) आणि चंद्रकांत बन साठे यांच्याबरोबर फ्लॅटचा ठरलेला व्यवहार सिद्धे यांनी पूर्ण करून २०१५ रोजी फ्लॅटचा ताबा द्यावा, अशी मागणी सिद्धे यांनी बांधकाम व्यवसायिकाकडे केली. परंतु, वारंवार मागणी करून सुद्धा फ्लॅटचा ताबा देण्यास बांधकाम व्यवसायिकाकडून टाळाटाळ केली जात होती.

वारंवार मागणी करून सुद्धा बिल्डरकडून फ्लॅट देण्यास टाळाटाळ होत असल्याचे लक्षात येताच सचिन सिद्धे यांनी बिल्डर विरोधात २०१७ ला रेरा मध्ये केस दाखल केली होती. (महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अ‍ॅथालेटरी) रेराने सिद्धे यांचे बाजून निकाल देत संबधित बिल्डरला सिद्धे यांना १०.०५ व्याजासह पूर्ण रक्कम देण्याचे आदेश दिले.

रेराने दिलेल्या आदेशानंतर देखील बिल्डरने सिद्धे यांना मानसिक त्रास देऊन रेराच्या आदेशाला दाद दिली नाही. आर्थिक व मानसिक त्रासाला कंटाळून अखेर सचिन सिद्धे यांनी बिल्डर विरोधात लोणीकंद पोलीस स्टेशनला धाव घेऊन बिल्डर विरोधात तक्रार दाखल केली आहे. सिद्धे यांच्या तक्रारीवरून नितीन प्रेमबेल्लरा, अविनाश रमेश कटनहार, चंद्रकांत बन साठे (सर्व रा. विमाननगर) या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक केशव वाबळे करीत आहेत.

कोट

फ्लॅटचा ठरलेला व्यवहार पूर्ण केला असताना बिल्डरकडून फ्लॅटचा ताबा देण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला.

- सचिन सिद्धे, तक्रारदार

Web Title: Fraud case filed against three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.