'एक कोटी गुंतवल्यास १ कोटी ३० लाख मिळवून देतो', असं सांगून केली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 05:30 PM2021-08-29T17:30:44+5:302021-08-29T17:30:53+5:30

बायजु या कंपनीच्या नावाचा गैरफायदा घेऊन तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे धक्कादायक प्रकार समोर

Fraud of '1 crore' in the name of Baiju company | 'एक कोटी गुंतवल्यास १ कोटी ३० लाख मिळवून देतो', असं सांगून केली फसवणूक

'एक कोटी गुंतवल्यास १ कोटी ३० लाख मिळवून देतो', असं सांगून केली फसवणूक

googlenewsNext

पुणे :  मुलांच्या ऑनलाईन शिक्षणाचे अ‍ॅप म्हणून अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या बायजु या कंपनीच्या नावाचा गैरफायदा घेऊन तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी निखील वसंत कदम (वय ३५, रा. काळेवाडी, पिंपरी) यांनी खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश आनंद माने (रा. गोपाळनगर, वरळी, मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शुक्रवार पेठेतील पानघंटी चौकात १० ऑक्टोबर २०२० रोजी घडला होता.

प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील मुलांना ऑनलाईन शिक्षण देणारे अ‍ॅप थिंग अँड लर्न या कंपनीने बायजु या नावाने काढले आहे.  मुळची ही कंपनी बंगलोरची आहे. असे असताना माने यांनी कदम यांना पश्चिम बंगाल येथे बायजु थिंग अँड लर्न ही कंपनी असून त्या कंपनीमध्ये १ कोटी रुपये गुंतवणुक केल्यास कंपनी १ कोटी ३० लाख रुपये देते असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून मानेंनी १ कोटी रुपये रोख दिले. त्यानंतर आता वर्ष होत आले तरी ही रक्कम परत न केल्याने कदम यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फसवणूकीची फिर्याद दिली आहे.

Web Title: Fraud of '1 crore' in the name of Baiju company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.