खेड शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे कोरोनाने निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 10:42 AM2020-10-10T10:42:30+5:302020-10-10T10:46:26+5:30

सुरेश गोरे यांच्या रूपाने खेड तालुक्याच्या इतिहासात शिवसेनेच्या पहिल्या आमदाराची नोंद झाली होती.

Former shivsena mla of khed suresh gore was passed away due to corona | खेड शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे कोरोनाने निधन

खेड शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे कोरोनाने निधन

Next
ठळक मुद्देतालुक्याच्या राजकारणात ‘भाऊ’ या टोपण नावाने होते परिचित

पुणे : खेडचे शिवसेनेचे प्रथम आमदार सुरेश नामदेव गोरे (वय ५७) यांचे आज सकाळी ९  वाजता पुण्यातील रुबी हॉल मध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यामागे आई, पत्नी, एक मुलगा, मुलगी, भाऊ, बहिणी, चुलते, पुतणे असा परिवार आहे. कोरोना संसर्ग झाल्यापासून मागील २० दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. तालुक्याच्या राजकारणात ‘भाऊ’ या टोपण नावाने ते सर्वपरिचित होते.
      राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या भाऊंनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भूषवले होते. आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे विरोधक म्हणून त्यांचे नेतृत्व उदयास आले होते. राजकीय गणिताच्या समीकरणात सुरेश गोरे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. त्यावेळी गोरे यांनी दिलीप मोहिते पाटील यांना मात दिली होती. त्यांच्या रूपाने खेड तालुक्याच्या इतिहासात शिवसेनेच्या पहिल्या आमदाराची नोंद झाली होती. विरोधकांवरही संयमी टीका करणारा हा नेता सदैव हसतमुख असायचा. कार्यकर्त्यांच्या कायम गराड्यात असणारा हा नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने खेड तालुक्यात धक्का बसला असून मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे.

Web Title: Former shivsena mla of khed suresh gore was passed away due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.