firstly Sharad Pawar is my father; Supriya Sule commented in Baramati | Maharashtra election 2019 : शरद पवार सर्वांत आधी माझे वडील ; सुप्रिया सुळे 

Maharashtra election 2019 : शरद पवार सर्वांत आधी माझे वडील ; सुप्रिया सुळे 

पुणे : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची घोषणा ऐकून शरद पवार हे आधी माझे वडील आहे असे मिश्किल वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत केले. 

राष्ट्रवादीच्या प्रचाराची सांगता प्रथेप्रमाणे बारामतीमध्ये झाली. साहजिकच कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचाही उत्साह होमपीचवर वाढलेला दिसून आला. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार येत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात एक घोषणा दिली. त्यावर सुळे यांनी तात्काळ दखल घेत 'तो आधी माझा बाप आहे' अशा शब्दात टिप्पणी केली. 

यावेळी त्या म्हणाल्या की, दिल्लीच्या तख्तालाही कोण तोंड देऊ शकतो तर ती व्यक्ती शरद पवार बंधू अजित पवार यांना दोन लाख मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.            

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: firstly Sharad Pawar is my father; Supriya Sule commented in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.