first shut down your Facebook and Whatsapp : Sambhaji Bhide Guruji | फेसबुक आणि व्हाट्सऍप पहिल्यांदा उकिरड्यावर थुंका : भिडे गुरुजींनी उपटले तरुणांचे कान 
फेसबुक आणि व्हाट्सऍप पहिल्यांदा उकिरड्यावर थुंका : भिडे गुरुजींनी उपटले तरुणांचे कान 

पुणे : फेसबुक आणि व्हाट्सऍपवर अजिबात शहाणपणा करायचा नाही.फेसबुक आणि व्हाट्सऍपची खेटर आपल्या कार्यात येता कामा नये. त्यामुळे ते पहिल्यांदा उकिरड्यावर थुंका अशा शब्दात संभाजी भिडे यांनी तरुणांचे कान उपटले. 

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठया संख्येने शिवप्रतिष्ठानचे धारकरी जंगली महाराज मंदिरात एकत्रित आले होते. त्यापूर्वी संभाजी भिडे गुरुजी यांनी उपस्थित धारकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी भगवे फेटे परिधान करून धारकरी सहभागी झाले होते. 

पुढे ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजाच्या मूर्तीच्या शेजारी छत्रपती संभाजी महाराजाची मूर्ती देखील स्थापन करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी करावा. छत्रपती शिवाजी महाराज हिंदू व्रत घेऊन जगले. तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत जगणारा समाज शिव प्रतिष्ठानच्या माध्यामातून तयार करायचा आहे. शिव प्रतिष्ठानच्या वतीने रायगडावर साकारण्यात येणार्‍या 32 मण सोन्याचे सिंहासनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील तीन हजार धारकऱ्यांच्या तुकड्यांनी जुलै महिन्यात किल्ले रायगडावर एकत्र यावे. असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले.


Web Title: first shut down your Facebook and Whatsapp : Sambhaji Bhide Guruji
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.