...अखेर रिंगरोडचा रस्ता बदलला अन् पुण्याच्या मावळ तालुक्यातील भंडारा डोंगर वाचला; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 05:18 PM2021-09-14T17:18:56+5:302021-09-14T17:19:04+5:30

भंडारा डोंगराला बोगदा पाडून रस्ता करण्याच्या रेखांकनात त्वरीत बदल करून डोंगराला कोणताही धक्का न लावता रस्ता करा :- अजित पवार

... Finally, the ring road was changed and Bhandara mountain in Maval taluka of Pune survived; Decision in the meeting of Deputy Chief Minister Ajit Pawar | ...अखेर रिंगरोडचा रस्ता बदलला अन् पुण्याच्या मावळ तालुक्यातील भंडारा डोंगर वाचला; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

...अखेर रिंगरोडचा रस्ता बदलला अन् पुण्याच्या मावळ तालुक्यातील भंडारा डोंगर वाचला; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

Next
ठळक मुद्दे वारकरी, आमदार व स्थानिक लोकांचा होता विरोध

पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या  (एमएसआरडीसी) वतीने पुणे जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या तब्बल ११० मीटर रुंद रिंगरोड मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र भंडारा डोंगराला भेदून किंवा बोगदा पाडून रस्ता करण्यात येणार होता. परंतु वारकरी, स्थानिक लोक आणि आमदार यांनी तीव्र विरोध केल्याने सोमवार मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रिंगरोडच्या रेखांकनात बदल करण्याचे आदेश एमएसआरडीसीला दिले. 

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुण्याच्या रिंगरोड प्रकल्पाला आता ख-या अर्थाने गती मिळाली आहे. पूर्व आणि पश्चिम असा दोन टप्प्यांत रिंगरोडचे काम करण्यात येत असून, पहिल्या टप्प्यातील रिंगरोडसाठी शंभर टक्के मोजणी पूर्ण झाली असून, दुस-या टप्प्यातील पूर्व भागातील मोजणी सुरू आहे.  एमएसआरडीसी वतीने हा रिंगरोड बांधण्यात येत आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात भोर तालुक्यातील केळवडे ते मावळ तालुक्यातील उर्सेख असा हा ६८ किलोमीटरचा रिंगरोड करण्यात येणार आहे. या रिंगरोड वरून ताशी तब्बल १२० किलोमीटर वेगाने प्रवास करता येणार आहे. परंतु या रिंगरोडच्या रेखांकनाबाबत काही आक्षेप होते. यासाठीच सोमवारी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात अजित पवार यांनी संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आमदारांनी काय अडचणी आहेत ते सांगितले. तर प्रशासनाने कसा असेल रिंगरोड याचे सादरीकरण केले. जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी पहिल्या टप्प्यातील मोजणी पूर्ण झाली असून, लवकरच दर निश्चितीची प्रक्रीया सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले.

आमची मागणी व पाठपुराव्याला यश 

एमएसआरडीसीचा हा रिंगरोड मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र भंडारा डोंगराला बोगदा पाडून रस्ता करण्यात येणार होता. परंतू याला वारक-यासह स्थानिक लोकांचा प्रचंड विरोध होता. यामुळेच रिंगरोडचे रेखांकन बदल करा यासाठी सतत पाठपुरावा केला. सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीतच रिंगरोडचे रेखांकन त्वरीत बदल करण्याचे आदेश एमएसआरडीसीच्या अधिका-यांना दिले. तसेच सर्व्हीस रोड आणि वडगाव चौकीतील जंक्शन पूलाच्या कामाला देखील मंजुरी दिली असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.

बैठकीत दिलेल्या आदेशानुसार अंमलबजावणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भंडारा डोंगराला बोगदा पाडून रस्ता करण्याच्या रेखांकनात त्वरीत बदल करून डोंगराला कोणताही धक्का न लावता रस्ता करण्यास सांगितले आहे. तसेच इतरही अनेक सूचना केल्या असून,  तशी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं एमएमआरडीएसीचे उपअभियंता संदीप पाटील म्हणाले आहेत.   

Web Title: ... Finally, the ring road was changed and Bhandara mountain in Maval taluka of Pune survived; Decision in the meeting of Deputy Chief Minister Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app