...अखेर हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कारशेडचा प्रश्नमार्गी; जिल्ह्यात भूसंपादनाचा 'देशमुख पॅटर्न'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 09:48 PM2021-04-01T21:48:04+5:302021-04-01T21:48:49+5:30

दर आठवड्याच्या आढावा बैठकीचा परिणाम: डाॅ.राजेश देशमुख

Finally, the question of Hinjewadi-Shivajinagar metro car shed solved | ...अखेर हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कारशेडचा प्रश्नमार्गी; जिल्ह्यात भूसंपादनाचा 'देशमुख पॅटर्न'

...अखेर हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कारशेडचा प्रश्नमार्गी; जिल्ह्यात भूसंपादनाचा 'देशमुख पॅटर्न'

Next

पुणे : गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेला हिंजवडी ते  शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे माण येथील कारशेडचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख याच्या मार्गदर्शनाखाली मावळ प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांनी गुरुवार (दि.1) रोजी तब्बल 60150 चौमी क्षेत्राचा पीएमआरडीए व महामेट्रो यांचे उपस्थित अधिका-यांना दिला. सदर प्रक्रिया हिंजवडी पोलीसस्टेशन यांचेकडील बंदोबस्तात शांततेत पार पडली.

पीएमआरडीए’कडून सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) या तत्त्वावर हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी टाटा-सिमेन्स यांच्यासोबत करार झाला असून, करारानुसार ’पीएमआरडीए’ने या प्रकल्पासाठी आवश्यक जागा टाटा-सिमेन्सला ताब्यात देणे आवश्यक होते. माण येथील कारशेडच्या जागेबाबत विरोध असल्याने भूसंपादनाची प्रक्रिया रखडली होती. आता हा अडथळा दूर झाला असल्याचे संदेश शिर्के यांनी सांगितले.  
या मेट्रो प्रकल्पाच्या कारशेडची जागा 2004 मध्ये महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळासाठी (एमआयडीसी) आरक्षित करण्यात आली होती. हे आरक्षण बदलून संबंधित जागा मेट्रो प्रकल्पासाठी देण्याची कागदोपत्री प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे भूसंपादनातील अडचणी दूर झाल्या आहेत. या जागेबाबत प्रकल्पग्रस्तांना द्यावयाच्या परताव्याची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. या मेट्रो प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या जागांपैकी यशदा आणि वाडिया महाविद्याालयांच्या आवश्यक जागांचा ताबाही घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या जागांसाठी पाठपुरावा सुरू आहे.
----
जिल्ह्यात भूसंपादनाचा "देशमुख पॅटर्न " 
    पुणे जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प केवळ भूसंपादन वेळेवर होत नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. परंतु पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून डाॅ.राजेश देशमुख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील रखडलेले विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. पुण्याचा रिंगरोड, मेट्रो, राष्ट्रीय महामार्गाची रखडलेली कामे असो की पालखी मार्ग, चांदणी चौकातील ब्रीज, नवले ब्रीज परिसरातील रस्ता,  या ठिकाणी असलेले भूसंपादनाचे प्रश्नमार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गेल्या सहाच महिन्यात प्रचंड गती दिली. देशमुख दर आठवड्याला संबंधित सर्व भूसंपादन अधिकारी व प्रकल्पांचे अधिकारी यांची आढावा बैठक घेतात. या बैठकीत एका आठवड्यात झालेली कामाची प्रगती,  काही अडचण असल्यास ती कशी दूर करता येईल यावर सविस्तर चर्चा करून मार्ग काढला जातो. यामुळेच सध्या पुण्यात भूसंपादनचा जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांचा " देशमुख पॅटर्न " ची चांगलीच चर्चा आहे.

Web Title: Finally, the question of Hinjewadi-Shivajinagar metro car shed solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.