शिरुर तालुक्यात बेकायदेशीर हिंदुस्थान पेट्रोलियम वायुवाहिनीचे काम शेतक-यांनी रोखले 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 08:07 PM2019-04-15T20:07:41+5:302019-04-15T20:11:55+5:30

एचपीसीएल अर्थात हिंदुस्थान पेट्रोलियम कापोर्रेशन लिमिटेड या कारखान्याची वायुवाहिनी शेतक-यांच्या शेतातून जात आहे...

Farmers prevented the work of illegal Hindustan Petroleum Air pipeline in Shirur taluka | शिरुर तालुक्यात बेकायदेशीर हिंदुस्थान पेट्रोलियम वायुवाहिनीचे काम शेतक-यांनी रोखले 

शिरुर तालुक्यात बेकायदेशीर हिंदुस्थान पेट्रोलियम वायुवाहिनीचे काम शेतक-यांनी रोखले 

googlenewsNext
ठळक मुद्देपिंपळे जगताप येथील घटना , शासकीय अधिकारीच करताहेत कायदेची पायमल्ली शेतक-यांना विश्वासात घेऊन त्यांच्या लेखी हरकतींचे उत्तर देणे आवश्यक

कोरेगाव भीमा : शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील शेतक-यांच्या मालकीच्याच शेतातून हिंदुस्थान पेट्रोलियम या (एचपीसीएल )कारखान्याची वायुवाहिनी जात असून वायुवाहिनीचे शेतक-यांचा विरोध झुगारुन व वायुवाहिनी कायद्याची शासकीय अधिका-यांनीच पायमल्ली करित चालु केलेले बेकायदेशीर काम शेतक-यांनी बंद पाडले. दरम्यान शिक्रापुर पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणणा-या शेतक-यांविरोधात गुन्हे दाखल केले आहे. 
        पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथून उरण, चाकण मार्गे पिंपळे जगताप याठिकाणाहुन एचपीसीएल अर्थात हिंदुस्थान पेट्रोलियम कापोर्रेशन लिमिटेड या कारखान्याची वायुवाहिनी शेतक-यांच्या शेतातून जात आहे. सदर वायुवाहिनीचे काम सुरु असताना यापूर्वी मागीलवर्षी जमिनीच्या थेट पंचनामा करण्यासाठी आलेल्या अधिका-यांना विरोध दर्शवित येथील शेतक-यांनी सदर कामाबाबत हरकती घेतल्या होत्या, मात्र, त्या हरकतीवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे शेतक-यांनी सांगितले.
     त्यांनतर अनेकदा याबाबत बैठका झाल्या परंतु सदर बैठकामध्ये झालेल्या निर्णयाची प्रत देण्याची मागणी शेतक-यांनी करित निवीदा प्रतही देण्यात आली नाही. सदर प्रकल्प हा केंद्र शासनाचा असल्याचे सांगत यापूर्वी झालेल्या बैठकांमध्ये सक्षम अधिकारी, पोलीस अधिकारी, कंपनी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकांमध्ये झालेले निर्णय व शेतक-यांनी अद्याप पर्यंत दहा ते बारा वेळा हरकती दाखल केल्या परंतु शेतक-यांना अद्याप पर्यंत त्यांचे लेखी उत्तर देण्यात आलेले नाही.    
         सोमवारी अनेक शेतकरी दाद मागण्यासाठी न्यायालयात गेलेले असताना पुन्हा अचानकपणे पोलीस बंदोबस्तात पुन्हा काम सुरु करण्यात आले. त्यावेळी पिंपळे जगताप येथील शेतक-यांनी पोलीस बंदोबस्तात सुरू असलेले काम अडवले आणि त्यावेळी पोलिसांनी देखील सदर काम शासकीय असून काम अडवू नये असे सदर शेतक-यांना सांगितले.  त्यावेळी शेतक-यांनी आम्ही घेतलेल्या हरकतीवर आम्हाला लेखी उत्तर मिळावे तसेच सदर कामाची टेंडर प्रत मिळावी. त्याशिवाय काम सुरु करू देणार नसल्याचे शेतक-यांनी सांगत काम करून देणार नाही या भूमिकेवर शेतकरी ठाम राहिले.
 याप्रकरणी एचपीसीएल कारखान्याच्या अधिकारी व पोलीसांना दमदाटी करुन शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी संतोष मोहन सोंडेकर , निलेश गोविंदराव जगताप ,कौशल्या शंकरराव जगताप , शंकरराव गणपतराव जगताप , बाळासाहेब दादाभाऊ थिटे , हेमलता बन्सीलाल सोंडेकर ,प्रज्ञा राहुल जगताप , राजश्री प्रदिप सोंडेकर यांच्यावर फिर्याद दाखल करण्यात आली आहे. 
------------------------------------------------------------
विधीमंडळाच्या आदेशाला केराची टोपली
     जुन २०१३ साली तत्कालीन विधान परिषदेचे उपसभापती कै. वसंतराव डावखरे यांच्या अध्यक्षतेखाली वायुवाहिनी बाधित शेतक-यांसाठी विनंती अर्ज समिती स्थापन करण्यात आली. त्यात विधिमंडळाच्या पटलावर वाजेवाडी, चौफुला, पिंपळे जगताप, मांजरेवाडी येथील बाधित शेतक-यांच्या परवानगीशिवाय काम सुरु करू नये असा आदेश सुद्धा पारित झाला असताना त्या आदेशाला शासकीय अधिका-यांनी केराची टोपली दाखवल्याचा शेतक-यांनी निषेध केला असल्याचे रमेश टाकळकर यांनी सांगितले.
---------------------------------------------------------
वायूवाहिनीचे काम बेकायदेशीरच 
        वायुवाहिनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शेतक-यांना विश्वासात घेऊन त्यांच्या लेखी हरकतींचे उत्तर देणे आवश्यक असताना सदर कामामध्ये एचपीसीएल कारखान्याच्या अधिका-यांकडुन वायुवाहिनी कायद्याचा भंग केला जात असून आपल्या मालमत्ता व जमिनीचे रक्षण करणे हा शेतक-यांचा हक्कच असुन लोकशाहीत तो नाकारता येत नसल्याने वायुवाहिनीचे काम बेकायदेशीरच असल्याचे मत अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे पुणे जिल्हाध्यक्ष रमेश टाकळकर यांनी सांगितले.
--------------------------------------------------------
शेतक-यांची जादा मोबदल्याची अपेक्षा
     सदर प्रकल्प शेतक-यांनी रोखल्यानंतर सदर प्रकल्पाच्या अधिका-यांशी आज बातचीत केली असता आमच्या कंपनीचे संपुर्ण काम पूर्ण झालेले असून शेतक-यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला देत शासकीय नियमानुसार काम सुरु आहे परंतु पिंपळे जगताप येथील शेतक-यांची जादा मोबदल्याची अपेक्षा असल्याचे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचे प्रबंधक नितीन दलाल यांनी सांगितले.

Web Title: Farmers prevented the work of illegal Hindustan Petroleum Air pipeline in Shirur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.