बिहारमधून मोठा शस्त्रसाठा येणार असल्याचे सांगणारा निघाला तोतया अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 03:46 PM2020-01-12T15:46:06+5:302020-01-12T15:47:10+5:30

पोलिसांनी आणखी खोलात जात चौकशी केल्यावर तो एका खुनाच्या गुन्ह्यात बिहारमधून फरार असल्याचे समोर आले़. काही वेळाने त्याचे बिंग फुटले आणि आपण खरी ओळख सांगत, आपण फसविण्यासाठी रॉ चा अतिरिक्त पोलीस अधीक्षक असल्याचे सांगितले़. 

fake RAW officer arrested in Kondhwa Pune | बिहारमधून मोठा शस्त्रसाठा येणार असल्याचे सांगणारा निघाला तोतया अधिकारी

बिहारमधून मोठा शस्त्रसाठा येणार असल्याचे सांगणारा निघाला तोतया अधिकारी

Next
ठळक मुद्देखुनाच्या गुन्ह्यात होता फरारी

पुणे : मी रॉ चा अधिकारी असून बिहारमधून मोठा शस्त्रसाठा येणार आहे, अशी माहिती कोंढवा पोलीस ठाण्यात आलेल्याने त्याने दिली. त्यामुळे पोलिसांची चांगलीच खळबळ उडाली. त्याच्याकडे अधिक चौकशी करीत असताना पोलिसांना संशय  आला़ पण, इतका मोठा अधिकारी असेल तर त्याची चौकशी कशी करायचा असा प्रश्न पोलिसांना पडला़, तेव्हा त्यांनी त्याचे आयकार्ड मागितले़ आयकार्ड ठेवत नसल्याचे सांगितल्यावर हा संशय अधिकच वाढला़. त्याचवेळी पोलिसांनी आणखी खोलात जात चौकशी केल्यावर तो एका खुनाच्या गुन्ह्यात बिहारमधून फरार असल्याचे समोर आले़. काही वेळाने त्याचे बिंग फुटले आणि आपण खरी ओळख सांगत, आपण फसविण्यासाठी रॉ चा अतिरिक्त पोलीस अधीक्षक असल्याचे सांगितले़. 
सोनु सुरज तिवारी (वय २६, रा़ लक्ष्मीनगर, कोंढवा, मुळ कासमा, ता़ रफिरंज, जि़ औरंगाबाद, बिहार) असे त्याचे नाव आहे़. हे नाट्य कोंढवा पोलीस
ठाण्यात शनिवारी दुपारी २ वाजता रंगले होते़.  याप्रकरणी पोलीस नाईक अमोल फडतरे यांनी फिर्याद दिली आहे़.  याबाबत पोलिसांनी सांगितले की, सोनु तिवारी हा मुळचा बिहारचा राहणार आहे़.  त्याने वादविवादातत तेथे आका नावाच्या व्यक्तीचा खुन केला. तो एक महिन्यांपूर्वी पळून पुण्यात आला़. त्याच्या दोन साथीदारांना बिहार पोलिसांनी अटक केली असून याचा ते शोध घेत आहेत़.  चार पाच दिवसांपासून तो कोंढव्यात रहायला आला़.  शनिवारी दुपारी तो कोंढवा पोलीस ठाण्यात आला व तेथील अधिकाऱ्यांना आपण रॉ मध्ये अ‍ॅडिशनल एस पी आहे़.  बिहारमधून मोठा शस्त्रसाठा कोंढवा परिसरात येणार आहे़ हे ऑपरेशन आपल्याला करायचे असून, तुम्ही आम्हाला मदत करा असे सांगितले. ही माहिती ऐकून अधिकारी अवाक झाले. त्यांनी तातडीने त्याची माहिती वरिष्ठांना दिली़ . त्याच्याकडून त्याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न सुरु केल्यावर त्याच्या बोलण्यात विसंगती
दिसून येऊ लागली़ . तेव्हा त्याच्याकडे ओळखपत्र विचारले़.  त्याने आपण ओळखपत्र ठेवत नसल्याचे सांगून पोलिसांनी काही नंबर सांगितले़.  त्यावरुन पोलिसांचा संशय आणखीनच वाढला़. 

त्यांनी पुण्यातील गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांना ही माहिती देऊन पुण्यात त्यांचा कोणी अधिकारी आला आहे का याची चौकशी केली़. तेव्हा त्यांनी असा कोणताही अधिकारी आला नसल्याचे सांगितले़.  त्यानंतर गुप्तचर अधिकारी कोंढवा पोलीस ठाण्यात आले़. त्यांनीही त्याचा चौकशी केली़.  त्याने सांगितलेले नंबर कोणत्याही अधिकाऱ्यांचे नसल्याचे स्पष्ट झाले़. तेव्हा त्याची झडती घेण्यात आली़ त्यात त्याच्याकडे पोलीस व लष्करी गणवेशातील काही फोटो आढळून आले़.   त्याचवेळी दुसरे अधिकारी बिहार पोलिसांशी संपर्क साधत होते़.  त्याची माहिती विचारल्यावर त्यांनी हा तर खुनाच्या गुन्ह्यातील फरारी असल्याचे सांगितले़.  तेव्हा आणखी एकदा पोलिसांवर अवाक होण्याची पाळी आली़.  पोलिसांनी त्याला अटक केली आहे़. बिहारचे पोलीस पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी पुण्याकडे रवाना झाले आहे. पोलीस इतके खोलात चौकशी करेल याची कल्पना आली नाही़सानु तिवारी याला त्याने हा बनाव का केला असे विचारल्यावर त्याने यापूर्वीही अशा प्रकारे काही ठिकाणी फसविले होते. पोलिसांना माहिती दिल्याचे दाखवून आपली ओळख निर्माण करुन इतरांना टोपी घालण्याचा त्याचा प्रयत्न होता. पण, कोंढवा पोलिसांनी त्याची बारकाईने चौकशी केल्यानेत्याचे बिंग फुटले़ आपली इतकी चौकशी पोलीस करतील असे वाटले नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.  

Web Title: fake RAW officer arrested in Kondhwa Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.