Fake account holder arrested for harassing woman | महिलेला त्रास देण्याकरिता सोशल मीडियावर बनावट अकाऊंट करणाऱ्याला अटक

महिलेला त्रास देण्याकरिता सोशल मीडियावर बनावट अकाऊंट करणाऱ्याला अटक

आदेश अशोक बोरा (रा. गोकुळनगर, यशश्री सोसायटी, कात्रज-कोंढवा रस्ता) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका २७ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. २३ जून ते १५ नोव्हेंबर दरम्यान ही घटना घडली आहे. आदेश याने स्वत:ची ओळख लपवून महिला व त्यांच्या नातेवाईकांना त्रास देण्याच्या हेतूने महिलेच्या नावाने जीमेल, फेसबुक, इंस्ट्राग्राम, स्नँपचँट व प्रिंटरेस्ट यावर बनावट अकाऊंट तयार केले आणि

महिला व तिच्या नातेवाईकांना मेसेज करून त्रास दिल्याप्रकरणी त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Fake account holder arrested for harassing woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.