पुणेकरांसाठी नाकारलेल्या ‘ई पास’ चे पुनरावलोकन करण्यात येणार, पोलीस आयुक्तांची ट्विटरवरून माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 01:32 PM2021-05-11T13:32:26+5:302021-05-11T13:32:33+5:30

पोलीस आयुक्त स्वतः घालणार लक्ष

The e-pass denied to Pune residents will be reviewed, the Commissioner of Police said on Twitter | पुणेकरांसाठी नाकारलेल्या ‘ई पास’ चे पुनरावलोकन करण्यात येणार, पोलीस आयुक्तांची ट्विटरवरून माहिती

पुणेकरांसाठी नाकारलेल्या ‘ई पास’ चे पुनरावलोकन करण्यात येणार, पोलीस आयुक्तांची ट्विटरवरून माहिती

Next
ठळक मुद्देअत्यंत महत्वाचे काम असतानाही केवळ कोव्हीड चाचणी प्रमाणपत्र न जोडल्याने अर्ज फेटाळले

पुणे: गेल्या १७ दिवसात तब्बल १ लाखांहून अधिक पुणेकरांनी ई पाससाठी अर्ज केला आहे. त्यातील केवळ २७ हजार ५९२ जणांचे पास मंजूर करण्यात आले. निम्म्याहून अधिक अर्ज नाकारण्यात आले आहेत. याबाबत अनेक तक्रारी येत आहे. त्यामुळे नाकरलेल्या अथवा प्रलंबित असलेल्या ई पासचे पुनरावलोकन करण्यात येणार आहे. 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याबाबत एक ट्वीट करुन माहिती दिली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ई पासबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आपण ई पाससाठी अर्ज केला असेल. ज्यामध्ये प्रलंबित किंवा नाकारले स्थिती दर्शविली गेली असेल. तर आपण या टवीटर अंतर्गत तपशीलांसह माझ्या लक्षात आणून द्या. आम्ही अर्जाचे पुनरावलोकन करु.

अनेकदा काही किरकोळ चुका तसेच अत्यंत महत्वाचे काम असतानाही केवळ कोव्हीड चाचणी प्रमाणपत्र न जोडल्याने अर्ज फेटाळण्यात येत आहेत. निम्म्याहून अधिक अर्ज फेटाळले गेले आहेत. अनेकांनी याबाबत तक्रारी केल्याने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या अर्जांचे पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: The e-pass denied to Pune residents will be reviewed, the Commissioner of Police said on Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.