डीएसके समूहाची ९०४ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 12:25 AM2019-02-15T00:25:28+5:302019-02-15T00:25:47+5:30

डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्सकडून गुंतवणुकदारांच्या आर्थिक फसवणूकप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ई.डी.) मनी लॉडरिंग अ‍ॅक्टनुसार डीएसके समूहाच्या ९०४ कोटी रुपयांच्या मालमत्तांवर जप्ती आणली आहे.

 DSK's assets worth Rs 940 crore were seized from ED | डीएसके समूहाची ९०४ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

डीएसके समूहाची ९०४ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

Next

पुणे : डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्सकडून गुंतवणुकदारांच्या आर्थिक फसवणूकप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ई.डी.) मनी लॉडरिंग अ‍ॅक्टनुसार डीएसके समूहाच्या ९०४ कोटी रुपयांच्या मालमत्तांवर जप्ती आणली आहे. त्यामध्ये जमीन, इमारत, सदनिका, जीवनविमा योजनांमधील गुंतवणूक, बँक खात्यांमधील रोख ठेवी यांचा समावेश आहे.
डी. एस. के. समूहाच्या वतीने राज्यातील गुंतवणुकदारांची १ हजार १२९ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. याबाबत डी. एस. कुलकर्णी, त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी व मुलगा शिरीषकुलकर्णी यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या तिघा संचालकांनी विविध ठेवी जमा योजना राबवून त्यामध्ये ३५ हजार गुंतवणूकदार, ठेवीदारांनी ठेवलेल्या १ हजार १२९ कोटी रुपयांचा अपहार करुन फसवणूक केली आहे़
या प्रकरणाचा तपास करत असताना केवळ ठेवी जमा करण्याच्या हेतूने डी़ एस़ कुलकर्णी, हेमंती कुलकर्णी आणि शिरीष कुलकर्णी यांनी इतरांच्या सहाय्याने डीएसके नावाने वेगवेगळ्या ८ भागीदारी संस्था स्थापन केल्या़ सामान्य गुंतवणुकदारांना त्या कंपन्या या डीएसकेडीएल या लिमिटेड कंपनीचाच भाग असल्याचे भासवून त्याद्वारे २००६ ते २०१७ दरम्यान त्याच्या कालावधीत ३ हजार कोटी रुपयांच्या ठेवी जमा केल्या़ ठेवीची जमा रक्कम भागीदारी संस्थेमधून प्रथम हेमंती कुलकर्णी यांच्या खात्यात जमा केली जात असे. तेथून ती इतर कंपन्या व दीपक कुलकर्णी, शिरीष कुलकर्णी व इतर नातेवाईक व इतर कंपन्यांमध्ये वर्ग केली जात असे़ हेमंती कुलकर्णी यांनी १७०, दीपक कुलकर्णी यांना १८५ कोटी, शिरीष कुलकर्णी यांना ३५० कोटी रुपये डीएसके ग्लोबल एज्युकेशन या कंपनीला तसेच २ हजार २०० कोटी रुपये डीएसकेडीएल या लिमिटेड कंपनीला वर्ग केले़

अमेरिकेत १०० कोटींची मालमत्ता खरेदी
या तिघांनी गोळा केलेल्या ठेवीतून अमेरिकेत १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम पाठवून तेथे मालमत्ता खरेदी केल्याचे तपासात दिसून आले आहे़ तसेच ठेवीची रक्कम मोठमोठ्या रक्कमेच्या विमा योजना खरेदीसाठी, चंगळवादी खर्चासाठी वापरली आहे़

Web Title:  DSK's assets worth Rs 940 crore were seized from ED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.