देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर मोकाट कुत्र्यांचा हल्ला ; सात जणांना घेतला चावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 07:46 PM2019-10-02T19:46:36+5:302019-10-02T19:47:20+5:30

बारामती शहराचे ग्रामदैवत असलेल्या माळावरच्या देवीला नवरात्रातील नऊ दिवस शहरातील तसेच तालुक्यातील भाविक दर्शनासाठी येत असतात.

dog attacks on devotees who visit the goddess; Take bite to seven peoples | देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर मोकाट कुत्र्यांचा हल्ला ; सात जणांना घेतला चावा

देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर मोकाट कुत्र्यांचा हल्ला ; सात जणांना घेतला चावा

Next
ठळक मुद्दे महिला व लहान मुलांची संख्या जास्त

बारामती  : ऐन नवरात्रोत्सवात शहरातील माळावरच्या देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे.यावेळी सात जणांना या कुत्र्यांनी चावा घेतला.त्यामुळे भाविकांमध्ये खळबळ उडाली. शहरात सर्वत्रच मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. तो आता शहरातील भाविकांपर्यत पोहचल्याने नागरीकांमध्ये संताप व्यक्त होत आहे...
    बारामती शहराचे ग्रामदैवत असलेल्या माळावरच्या देवीला नवरात्रातील नऊ दिवस शहरातील तसेच तालुक्यातील भाविक दर्शनासाठी येत असतात. यामध्ये महिला व लहान मुलांची संख्या जास्त असते .पहाटेपासूनच महिलांची दर्शनासाठी गर्दी असते. मात्र या हल्ल्यामुळे भाविकांमध्ये येथील भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे.
 मंगळवारी सकाळी सात वाजता दर्शन करून मंदिराच्या बाहेर आल्यावर एका कुत्र्याने रस्त्यावर दिसेल त्या भाविकावर जोरदार हल्ला चढवला. सात लोकांना या कुत्र्यांनी चावा घेतला. काही दिवसांपूर्वी दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे. यामध्ये लहान मुलीला कुत्र्याने चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.  यावेळी घाबरून दर्शनाला आलेल्या नागरिकांची खूप पळापळ झाली. या मध्ये येथील काचेची कप बशी,खेळणीची दुकाने यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले ,असे येथील प्रत्यक्षदर्शी दुकानदार अमीर अत्तार यांनी सांगितले .तसेच येथील स्थानिक दुकानदारांनी सांगितले जवळच असणाऱ्या कचरा डेपोमध्ये शहरातील कचरा टाकला जातो. यामध्ये त्यांना खायला मिळते तसेच येथील परिसरातील  हॉटेल मधील खरकटे खायला मिळत असल्याने ही कुत्री धष्टपुष्ट झाली आहेत.ही कुत्री सरळ अंगावर धावून येतात, असे दुकानदारांनी सांगितले
मागील आठवड्यात या भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी बारामती नगर पालिकेवर आंदोलन केले होते. त्यावेळी मुख्याधिकारी यांनी लवकरच या कुत्र्यांना पकडण्याची कारवाई करावी अन्यथा पहाटेच्या यव असे सांगितले होते .मात्र, आज आठ दिवस उलटून सुद्धा काहीही कारवाई झाली नसल्याची नागरीकांची तक्रार आहे.
——————————————————
काल पासून भटकी कुत्री पकडायची कारवाई सुरू केली आहे. यासाठी दौंड येथील लोक पाचारण करण्यात आले आहेत. मात्र आपल्याकडे असणारा पिंजरा लहान पडत असल्याने मोठा पिंजरा मागवला आहे.- योगेश कडूसकर, मुख्यधिकारी बानप
————————————————

Web Title: dog attacks on devotees who visit the goddess; Take bite to seven peoples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.