Dog Attack on senior citizen amd student in school area | शाळेच्या आवारात घुसुन पिसाळलेल्या कुत्र्याचा विद्यार्थी,नागरिकांवर हल्ला
शाळेच्या आवारात घुसुन पिसाळलेल्या कुत्र्याचा विद्यार्थी,नागरिकांवर हल्ला

ठळक मुद्दे बारामती शहरात अनेक दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट

बारामती : बारामती भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर असताना मंगळवारी(दि. ५) शाळेच्या पहिला दिवस पिसाळलेल्या कुत्र्यांनी विद्यार्थी,नागरीकांना चावा घेतल्याने चचेर्चा ठरला.  शहरात सकाळ पासूनच पिसाळलेल्या कुत्र्यांनी वयस्कर तसेच शाळेतील विद्यार्थ्यांसह ९ जणांना चावा घेतला आहे. पिसाळलेली कुत्री आक्रमक झाल्याचे चित्र आहे.
बारामती शहरात अनेक दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. यावर उपाय योजना करण्यासाठी शहरातील नागरिकांनी बारामती नगरपालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. शहरातील अनेक भागत चौकात ही धष्टपुष्ट कुत्री पसरलेली असतात. या बाबत बारामतीकरांना आंदोलन देखील करावे लागले आहे.त्याची दखल घेवुन नगरपरिषद प्रशासनाने भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहिम देखील हाती घेतली आहे.
मात्र,मंगळवारी  सकाळ पासूनच शहरातील वेगवेगळ्या भागात पिसाळलेल्या कुत्र्याने नऊ जणांचा चावा घेतला आहे. भिगवण रस्त्यावरील मएसो शाळेमध्ये जेवणाची सुट्टी झाली होती.यावेळी शाळेच्या आवारात शिरुन कुत्र्याने एका विद्यार्थिनीच्या दंडाला चावा घेतला. चावा घेणाºया कुत्र्याला शाळेतील शिक्षक,पालकांनी विद्याथीर्नीपासुन दुर करण्याचा प्रयत्न केला.त्यासाठी  कुत्र्याला मारहाण देखील करण्यात आली.मात्र, पिसाळलेल्या कुत्र्याने  त्या विद्यार्थिनीला सोडले नसल्याचे,  प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 
तसेच माळावरच्या देवीच्या मंदिराजवळ सेवानिवृत्त अनंत पाटील हे घरापाशी उभे होते. या पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्या पायाला व हाताला चावा घेतला आहे.शिवाय मएसो शाळेचे सुरक्षा रक्षक दत्तात्रय शिंदे यांना या कुत्र्याने हाताला मोठा चावा घेतला .शहरातील प्रगतीनगर येथे दत्तात्रय भोसले हे मित्रांशी गप्पा मारत उभे असताना अचानक या पिसाळलेल्या कुत्र्याने मनगटाला पकडले.त्यांच्या मित्रांनी त्या कुत्र्याला मारण्याचा प्रयत्न केला .मात्र ,त्याने भोसले यांच्या हात सोडला नाही ,असे भोसले यांनी सांगितले .त्यांच्या मनगटाला मोठी जखम झाली आहे. या सगळ्या प्रकरणात या पिसाळलेल्या कुत्र्याने उभ्या असणाºया आणि वयस्कर नऊ नागरिकांना निर्दयपणे चावा घेतला आहे.दिवसा ढवळ्या  पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उपचारासाठी सिल्व्हर जुबाली हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. रात्रीच्या वेळी १५ ते २० च्या टोळक्याने ही कुत्री असतात .रात्रीच्या वेळी वयस्कर किंवा महिला यांच्यावर या भटक्या कुत्र्यांनी केलेला हल्ला  जीवावर बेतण्याची भीती व्यक्त होत आहे. ३ - ४ दिवसांपासून या भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी बारामतीतील नेचर फ्रेंड्स आॅर्गनायझेशन या प्राणी मित्र संस्थेला जबाबदारी देण्यात आली आहे.
———————————————
या महिन्यात भटकी कुत्री चावल्याने  २०० रुग्ण ांना  इंजेक्शन देण्यात आली आहेत. ती आपल्याकडे उपलब्ध असतात.मात्र,  अँटी रेबीज सिरम या इंजेक्शनच्या तुटवडा आहे. बाहेरील तालुक्यातील रुग्ण देखील येत असल्याने आम्ही लस उपलब्ध ठेवत आहोत.
डॉ. सदानंद काळे, वैद्यकीय अधीक्षक, सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय,बारामती
———————————
सिल्व्हर ज्युबली हॉस्पिटल बारामती
बारामती शहरातील गाड्यांच्या मागे धावणारी मुलांच्या मागे धावणाºया ज्या भागातून तक्रार येत आहे.तेथील मागील १५ दिवसांपासून १०० भटकी कुत्री पकडून त्यांना शहरापासून ५० किलोमीटर अंतरावर योग्य ठिकाणी सोडले आहे. नागरिकांनी रस्त्यावर कुत्री दिसल्यास घाबरून न जाता सावकाश गाडी चालवावी .तसेच एखादे कुत्रे पिसाळले आहे, असे वाटल्यास त्याची तक्रार बारामती नगर पालिकेकडे करावी.
बबलू कांबळे, प्रमुख, नेचर फ्रेंड्स आॅर्गनायझेशन 

Web Title: Dog Attack on senior citizen amd student in school area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.