कोरोना रात्रीचाच फिरतो की काय? 'नाईट कर्फ्यू'च्या घोषणेनंतर हॉटेल चालकांचा त्रस्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 05:27 PM2020-12-22T17:27:58+5:302020-12-22T17:29:08+5:30

ऐन नाताळाच्या काळातच ही बंदी आल्याने हॉटेल व्यावसायिक संतापले आहेत.

Does Corona walk around at night? Hoteliers question after night curfew | कोरोना रात्रीचाच फिरतो की काय? 'नाईट कर्फ्यू'च्या घोषणेनंतर हॉटेल चालकांचा त्रस्त सवाल

कोरोना रात्रीचाच फिरतो की काय? 'नाईट कर्फ्यू'च्या घोषणेनंतर हॉटेल चालकांचा त्रस्त सवाल

Next

पुणे: राज्य सरकारच्या रात्री संचारबंदी लागू करण्याच्या निर्णयावर सगळे हॉटेल व्यावसायिक संतप्त झाले आहेत. कोरोना टाळेबंदीनंतर आता कुठे सगळे सुरळीत होत असताना पुन्हा सरकारने आमच्या व्यवसायावर संक्रात आणली आहे अशीच सर्वांची भावना असून कोरोना विषाणू काय रात्रीचाच फिरतो का असा त्रस्त सवाल ते करत आहेत.

ऐन नाताळाच्या काळातच ही बंदी आल्याने हॉटेल व्यावसायिक संतापले आहेत. सलग ६ महिन्यांच्या बंदीनंतर त्यांना व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळाली. त्यानंतर मागील महिनाभरात व्यवसाय सुरळीत होत होता. त्यानंतर नाताळात चांगला व्यवसाय होईल अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र आता सरकारच्या निर्णयाने त्यावरही पाणी पडले आहे असे हॉटेलचालक बोलून दाखवत आहेत.

आता त्यांना रात्री साडेअकरा पर्यंत परवानगी आहेच. त्यामुळे त्यांना साडेदहा वाजताच आवराआवर करावी लागत होती. परवानगी रात्री १२ पर्य़त करावी अशी त्यांची मागणी होती. ते तर नाहीच झाले ऊलट ११ नंतर संचारबंदी आल्याने त्यांना आता १० वाजताच सगळे आवरावे लागणार आहे. 
पुण्यात हॉटेल असोसिएशनचे ३ हजार सदस्य आहेत. त्याशिवाय लहानमोठे असे १० हजार खाद्यपदार्थ विक्रेते आहेत. सरकारच्या निर्णयाने त्यांच्यात तीव्र नाराजी आहे. संघटनांच्या वतीने सरकारपर्यंत ही नाराजी पोहचवण्यात येणार आहे अशी माहिती हॉटेल व्यावसायिकांनी दिली.

सरकारचा निर्णय अनाकलनीय आहे. आम्ही त्याविरोधात दाद मागत आहोत. आमची रात्री १२ पर्यंतच्या परवानगीची मागणी सोडून सरकारने हा असा निर्णय घेतल्याने पुन्हा आमच्यावर आर्थिक संकट येणार आहे. 
गणेश शेट्टी: अध्यक्ष, पुणे हॉटेल असोसिएशन.
--------
सरकारचे धोरणच लक्षात यायला तयार नाही. कोरोनाचे संकट मोठेच आहे, मात्र त्यावर अशी बंदी वगैरे घालून मार्ग निघणार नाही.
किशोर सरपोतदार, अध्यक्ष, महाराष्ट्र केटरिंग असोसिएशन
-----//
सरकारने काहीतरी कारण असल्यामुळेच असा निर्णय घेतला असावा असे आम्ही समजतो. यावर चर्चा करून मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. 
विक्रमराज शेट्टी, अध्यक्ष, वेस्टर्न इंडिया हॉटेल अँन्ड रेस्टॉरंट असोसिएशन.
 

Web Title: Does Corona walk around at night? Hoteliers question after night curfew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.