Crypto Currency: क्रिप्टो एक्सचेंज सुरु करणार्‍या व्यावसायिकाला व्हिएतनाममधील डेव्हलपरने घातला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 01:25 PM2022-05-20T13:25:13+5:302022-05-20T14:36:13+5:30

सर्व्हर हॅक करुन पळविले क्रिप्टॉक्स टोकन, बायनाज एक्सचेंजने गोठविली काही रक्कम

Developer in Vietnam sues crypto exchange startup | Crypto Currency: क्रिप्टो एक्सचेंज सुरु करणार्‍या व्यावसायिकाला व्हिएतनाममधील डेव्हलपरने घातला गंडा

Crypto Currency: क्रिप्टो एक्सचेंज सुरु करणार्‍या व्यावसायिकाला व्हिएतनाममधील डेव्हलपरने घातला गंडा

Next

पुणे : क्रिप्टो एक्सचेंज सुरु करीत असलेल्या एका पुण्यातील व्यावसायिकाला व्हिएतनाममधील डेव्हलपरने आपल्या साथीदारांच्या मदतीने २ लाख ३४ हजार क्रीप्टॉक्स टोकन स्वत:कडे वळवून फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, हे चोरलेले टोकन बायनाज एक्सचेंजवर विक्री झाल्याचे समजल्यानंतर बायनाजने वॉलेटमध्ये असलेली रक्कम गोठविली आहे.
 
याप्रकरणी बावधन येथे राहणार्‍या एका २९ वर्षाच्या व्यावसायिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी वो थी हाँग, वांग जंग (ट्रान व्हॅन विन्ह) न्युदेनखाक थिन्ह (सर्व रा. व्हिएतनाम) आणि सुमा अख्तर (रा. बांगला देश) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २८ जानेवारी ते २५ एप्रिल २०२२ दरम्यान घडला.
 
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्यांची कंपनी आहे. ते क्रिप्टो एक्सचेंज सुरु करीत आहेत. त्यासाठीचे व्हिएतनाममधील वांग जंग (व्हिएतनाम) याला कोंडिग करण्याचे काम दिले होते. अन्य कामे पुण्यातून होत होती. त्यांनी सॉफ्टवेअर कसे काम करते, याची तपासणी करण्यासाठी काही क्रिप्टो खरेदी केले होते. ते त्यांनी सर्व्हरवर ठेवले होते. १७ एप्रिल रोजी फिर्यादी यांचा सर्व्हर अचानक बंद पडला. तो सुरु करण्यास त्यांना तीन दिवस लागले. त्यानंतर त्यांनी पाहिले तर त्यांच्या सर्व्हरवर असलेले सर्व टोकन गायब असल्याचे दिसून आले. त्यांनी ही बाब वांग जुंग याला सांगितली. तेव्हा त्याने कोणीतरी सर्व्हर हॅक केला असून त्याने सर्व टोकन घेतले आहेत.  आम्ही चौकशी करुन सांगतो, असे त्याने सांगितले. त्याबरोबर फिर्यादी यांनी चौकशी सुरु केली. तेव्हा सर्व काम वांग युंग यानेच केल्याचे व त्यानेच सर्व्हरवरील टोकन चोरल्याचे आढळून आले. 
कोडिंगचे काम करीत असताना त्यांनी या डेटामधील कंपनीचे हॉट व्हॉलेटची प्रायव्हेट की व सर्व्हरचे इतर पासवर्ड चोरले. कंपनीच्या सर्व्हरमध्ये अनाधिकृतपणे प्रवेश करुन सर्व्हरवरील हॉट वॉलेटमधील २३ हजार ६०४ डॉलर अंदाजे २३ लाख ८८ हजार ३२० रुपयांचे एकूण २ लाख ३४ हजार १३४ क्रीप्टॉक्स टोकन  ऑनलाईन पद्धतीने स्वत:चे व साथीदारांच्या खात्यावर युएसडीटी टोकनमध्ये वळून फिर्यादी यांची फसवणूक केली आहे. 
त्यांनी वांग युंग याच्याशी संपर्क साधल्यावर त्याने ते कबुल केले व पण आता पैसे नसल्याचे सांगितले. दरम्यान, या क्रिप्टो टोकनचा शोध घेतला असता ते बायनाज एक्सचेंजवर विकण्यात आल्याचे आढळून आले. फिर्यादी यांनी बायनाज एक्सचेंजशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी वॉलेटमध्ये शिल्लक असलेले ८ लाख रुपये गोठविले आहेत. फिर्यादी यांना आता न्यायालयात दावा करुन हे गोठविलेले पैसे मिळावावे लागणार आहेत. पोलीस निरीक्षक चिंतामण अधिक तपास करीत आहेत.

Read in English

Web Title: Developer in Vietnam sues crypto exchange startup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.