दगडूशेठ गणपतीला 1,111 हापूस आंब्यांची आरास, कोरोनामुक्तीसाठी प्रार्थना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 09:28 AM2021-05-14T09:28:48+5:302021-05-14T09:28:59+5:30

देशाला लवकरच कोरोनामुक्त करण्यासाठी पुणेकरांची श्रीमंत दगडूशेठ गणरायाकडे केली प्रार्थना

Decoration of 1,111 hapus mangoes to Dagdusheth Ganapati, prayer for coronation free India | दगडूशेठ गणपतीला 1,111 हापूस आंब्यांची आरास, कोरोनामुक्तीसाठी प्रार्थना

दगडूशेठ गणपतीला 1,111 हापूस आंब्यांची आरास, कोरोनामुक्तीसाठी प्रार्थना

googlenewsNext
ठळक मुद्देपुण्यात दरवर्षी ही गणरायासाठी मोठ्या प्रमाणात आरास केली जाते. पण, कोरोनाचे सावट पाहता यंदा साध्याच पद्धतीने मंदिरात अक्षय तृतीया साजरी केली जात आहे.

पुणे - अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर पुणेकरांचे लाडके दैवत असलेल्या दगडुशेठ गणपतीला हापूस आंब्याची आरास करण्यात आली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे अक्षय तृतीयेनिमित्त गणपती मंदिरात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा कोविडमुळे साध्या पद्धतीनेच आंबा महोत्सव होणार आहे. मात्र, दगडूशेठ गणपतीला 1,111 हापूस आंब्याची आरास करुन आंबा महोत्सवाची जोरदार सुरुवात झाली आहे. तसेच, कोरोनाचं लवकरच विसर्जन करण्याची प्रार्थनाही भाविकांनी बाप्पांकडे केली.

पुण्यात दरवर्षी ही गणरायासाठी मोठ्या प्रमाणात आरास केली जाते. पण, कोरोनाचे सावट पाहता यंदा साध्याच पद्धतीने मंदिरात अक्षय तृतीया साजरी केली जात आहे. दुसऱ्या दिवशी हा आंब्याचा प्रसाद ससून रुग्णालयात रुग्णांना दिला जातो. कोरोनाचे सावट पाहता मंदिरात भाविकांना प्रवेश बंदी करण्यात आली आल्याने रोडवरुनच भाविकांनी बाप्पाचे दर्शन घेतले. दरम्यान, कोरोनाचे सावट पाहता ॲानलाईन दर्शन घ्या असे आवाहन ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे. देशावरील कोरोनाचे संकट लवकरात लवकर जाऊ दे ... अशी प्रार्थनाच गणरायाला भाविकांनी केली आहे. 

 

 

 

 

 

 

 

 

 

Web Title: Decoration of 1,111 hapus mangoes to Dagdusheth Ganapati, prayer for coronation free India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.