पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दत्तात्रेय भरणेंचा उमेदवारी अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 05:19 PM2021-12-01T17:19:26+5:302021-12-01T17:19:38+5:30

राज्यमंत्री भरणे गेली २५ वर्षे बँकेचे संचालक मंडळात आहेत. बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काही वर्षे कामकाज पाहीले आहे

Dattatreya Bharanes candidature application filed for the five year election of Pune District Central Co-operative Bank | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दत्तात्रेय भरणेंचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दत्तात्रेय भरणेंचा उमेदवारी अर्ज दाखल

Next

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात सुरवात झाली असून ब वर्ग मतदारसंघातून  सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  

राज्यमंत्री भरणे गेली २५ वर्षे बँकेचे संचालक मंडळात आहेत. बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काही वर्षे कामकाज पाहीले आहे. बुधवारी १ डिसेंबरला त्यांनी बँकेच्या निवडणूकीकरीता ब वर्ग मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेली चार वेळा त्यांनी याच मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. यावेळी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, आमदार संजय जगताप, व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, बाजार समितीचे अध्यक्ष दत्तात्रेय फडतरे, प्रशांत पाटील, प्रतापराव पाटील, भरतराजे भोसले, उपस्थित होते. 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशात अग्रेसर बँक समजली जाते. शेतकर्‍यांना शुन्य टक्क्याने पीककर्ज देण्यात येते सुमारे २०० कोटी पेक्षा जास्त नफा असणारी बँक आहे. या बँकेत उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, कायम संचालक मंडळात आहेत ६ डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार असून २ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. 

Web Title: Dattatreya Bharanes candidature application filed for the five year election of Pune District Central Co-operative Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.