सोशल मीडियावर शरद पवार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट; वॉचमनला अटक, १३ जणांचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 03:46 PM2021-05-06T15:46:57+5:302021-05-06T18:25:15+5:30

आरोपी हा मूळचा दौंड तालुक्यातील राहणारा असून पुण्यात वॉचमन म्हणून काम करतो....

Cyber police have arrested Watchman for posting offensive posts about national heroes on social media | सोशल मीडियावर शरद पवार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट; वॉचमनला अटक, १३ जणांचा शोध सुरू

सोशल मीडियावर शरद पवार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट; वॉचमनला अटक, १३ जणांचा शोध सुरू

Next

पुणे : सोशल मीडियावर राष्ट्रपुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्‍या एका वॉचमनला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. स्वरुप प्रल्हाद भोसले (वय ३५, रा. भिलारेवाडी, मूळ गाव राजेगाव, ता. दौंड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. न्यायालयाने अधिक तपासासाठी ८ मेपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. 

याप्रकरणी आकाश चंद्रकांत शिंदे (वय २४, रा. डावी भुसारी कॉलनी, कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून वेगवेगळ डिजिटल माध्यमावर कोणी आक्षेपार्ह काही पोस्ट टाकल्यास त्यांची दखल घेऊन त्याचा तपास विविध जिल्ह्यातील पोलिसांकडे सोपविला जातो. पुणे शहर सायबर पोलिसांकडे अशा काही प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हाके यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तीवर फेसबुक ग्रुप, इटेलिक्चुअल फोरम नावाचा व्हॉटसअ‍ॅप ग्रुप, कोमट बॉईज अँड गर्ल फेसबुक ग्रुप, सीएम देवेंद्र फडणवीस फॅन क्लब, फेसबुक ग्रुप, इन्स्टाग्राम व ट्विटर या समाज माध्यमावर आक्षेपार्ह मेसेज टाकण्यात आले आहेत. समाजातील वर्गावर्गामध्ये शत्रुत्व निर्माण करण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह पोस्ट टाकून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच शरद पवार अशा प्रतिष्ठि राजकीय व्यक्तिमत्वाच्या लौकिकाला बाधा आणण्याकरिता त्यांचे फोटो मॉर्फ करुन तसेच घाणेरड्या व अश्लिल अशा पोस्ट टाकून बदनामीकारक पद्धतीने प्रसारित करुन बदनामी केली. तसेच ब्राम्हण व ब्राम्हणेतर जातीमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकल्या.

वेगवेगळ्या आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे नाना पंडित, वैभव पाटील, महेश गहुडले, धनंजय जोशी, सोनाली राणे, जयसिंग मोहन, संदीप पाटील शौर्यन श्रीकृष्ण चोरगे, अतुल अयाचित, राजेंद्र पवार, राज पाटील, मुकेश जाधव इतर समाजमाध्यम वापरकर्ते यांचा सायबर पोलीस शोध घेत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके अधिक तपास करीत आहेत.

स्वरुप भोसले हा मुळचा दौंड तालुक्यातील राहणारा असून पुण्यात वॉचमन म्हणून काम करतो. त्याने ट्विटर अकाऊंटवर शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. एका अकाऊंटवरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट पाहण्यात आली. त्या रागातून आपण ही पोस्ट टाकल्याचे त्याने मान्य केले. त्याचे सस्पेंड केलेले ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरु करुन त्यातील पुराव्याच्या दृष्टीने महत्वाच्या स्क्रीन शॉट्सचे फोटोग्राफ व प्रिंट ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

आरोपीचा या पोस्ट टाकण्यामागील हेतू तपासणे तसेच त्याचा इतर कोणत्या समाज विघातक गटाशी संपर्क आहे का याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी केली. न्यायालयाने आरोपीला ८ मेपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.

Web Title: Cyber police have arrested Watchman for posting offensive posts about national heroes on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.