महिला शिपायाला लग्नाचे आमिष दाखवून फसविणाऱ्या नांदेडच्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 11:26 AM2020-12-03T11:26:33+5:302020-12-03T11:27:59+5:30

रहीम चौधरी हा पुणे पोलीस दलात पोलीस कर्मचारी म्हणून काम करीत होता पुढे खात्यातंर्गत परीक्षा पास होऊन रहीम चौधरी हा पोलीस उपनिरीक्षक झाला. 

Crime was registred against Nanded police sub-inspector in the rape and fruad with women police | महिला शिपायाला लग्नाचे आमिष दाखवून फसविणाऱ्या नांदेडच्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

महिला शिपायाला लग्नाचे आमिष दाखवून फसविणाऱ्या नांदेडच्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

Next

पुणे : महिला शिपायाला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरीक जवळीक साधून फसवणूक केल्याप्रकरणी नांदेड येथील पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक रहीम बशीर चौधरी (वय ३०, रा. शिवनखेड खुर्द, अहमदपूर, लातूर)असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी एका महिला पोलीस शिपायाने शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. 
याबाबतची माहिती अशी, रहीम बशीर चौधरी हा पुणे पोलीस दलात पोलीस कर्मचारी म्हणून काम करीत होता. पुढे खात्यातंर्गत परीक्षा पास होऊन रहीम चौधरी हा पोलीस उपनिरीक्षक झाला.  यादरम्यान, मार्च २०१४ मध्ये त्याची पुण्यातील महिला पोलीस शिपायांशी ओळख झाली. त्याने या महिलेला लग्नाची गळ घातली. तेव्हा तिने माझे लग्न झाले असून मला मुलगा आहे, असे सांगितले. त्यावर त्याने मुलाची जबाबदारी घेतो, असे सांगून त्यांच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. फिर्यादीवर वारंवार जबरदस्तीने शरीर संबंध निर्माण केले. फिर्यादी यांनी लग्नाचा तगादा लावल्यावर त्याने २३ नोव्हेंबर २०१९ रोजी नांदेड येथे साखरपुडा केला. त्यानंतर मी तुझ्याशी लग्न करणार असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. बहिणीचे लग्नाचे कर्ज असून शेती गहाण ठेवली आहे. ती सोडविण्यासाठी तिच्याकडे पैशाची मागणी केली. तेव्हा फिर्यादीने कर्ज काढून रहीम चौधरी यांच्या वडिलांना ५ लाख रुपये दिले. तसेच घराचे बांधकामासाठी त्याने फिर्यादीकडून ९ ते १० तोळे सोने घेऊन गेला. ते परत केले नाही. त्याबाबत चौकशी केल्यावर चौधरी याच्या नातेवाईकांनी फिर्यादी यांना अश्लिल शिवीगाळ करुन हात पाय बांधून उचलून नेण्याची धमकी दिली. तेव्हा रहीम चौधरी याने आपली फसवणूक केल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्याची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Crime was registred against Nanded police sub-inspector in the rape and fruad with women police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.