गुन्हा एकाचा अन् दंडाची पावती दुसऱ्याला : वाहतूक पोलिसाच्या चुकीचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 04:29 PM2019-08-29T16:29:35+5:302019-08-29T16:33:53+5:30

आपले वाहन आपल्या सोसायटीच्या वाहनतळात उभे असताना आपण बाहेर गेलोच कधी, असा प्रश्न त्यांना पडला.

crime one peson and penalty another one | गुन्हा एकाचा अन् दंडाची पावती दुसऱ्याला : वाहतूक पोलिसाच्या चुकीचा फटका

गुन्हा एकाचा अन् दंडाची पावती दुसऱ्याला : वाहतूक पोलिसाच्या चुकीचा फटका

googlenewsNext
ठळक मुद्देवाहतूक पोलिसाच्या चुकीमुळे नियम पाळणाऱ्या नागरिकालाच झाला दंड

पुणे  : वाहतुकीचे नियम तोडल्यामुळे ई-चलनाद्वारे एकाला आकारलेली दंडाची पावती दुसऱ्याच्या मोबाईलवर आल्याने वाहतुकीचे सर्व नियम पाळणाऱ्या एका नागरिकाला नाहक मनस्ताप सहन करावा लागला. दंड आकारणीमध्ये सुलभता यावी, यासाठी सुरु करण्यात आलेली ई-चलन प्रणाली वाहतूक पोलिसांच्या चुकीमुळे सर्वसामान्यांसाठी त्रासदायक ठरू लागल्याचे चित्र आहे.
नऱ्हे येथे राहणारे सुरेश पिंगळे (वय ५४, रा. मानाजीनगर, नऱ्हे ) यांच्या मोबाइलवर २२ऑगस्ट रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास पुणे वाहतूक पोलिसांचे ई-चलन प्राप्त झाले. रात्री साडेदहाच्या सुमारास गाडी चालवताना मोबाईल फोन वापरल्याने दोनशे रुपयांची दंड भरण्याबाबतचे त्यात नमूद होते. ही दंडाची पावती पाहून या नागरिकाला धक्काच बसला. आपले वाहन आपल्या सोसायटीच्या वाहनतळात उभे असताना आपण बाहेर गेलोच कधी, असा प्रश्न त्यांना पडला. अखेर पावतीसोबत पाठवलेल्या वाहनाचे छायाचित्र पाहिले असता हे वाहन आपले नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. छायाचित्रातील वाहनाचा क्रमांक वेगळा होता. त्यानंतर पोलिसांकडून झालेल्या चुकीचा उलगडा त्यांना झाला. वाहतूक पोलिसांच्या या प्रतापाबद्दल त्यांनी १०० नंबरला फोन करून कळविण्याचा प्रयत्न केला असता फोन लागला नसल्याचे त्यांनी सांगितले. 


......
च् मी रोज कंपनीच्या बसने ऑफिसला जातो, त्यादिवशीही मी बसनेच ऑफिसला गेल्याने माझी करड्या रंगाची दुचाकी स्कूटर (क्रमांक एमएच १२ आरयू १७८७) ही दुचाकी सोसायटीच्या वाहनतळामध्ये उभी होती. असे असतानाही वाहतूक पोलिसांचे दंडासाठीचे आलेले ई-चलन पाहून मला धक्काच बसला, असे तक्रारदार सुरेश पिंगळे यांनी सांगितले. 
च् शहर वाहतूक पोलिसांच्या कारभारात पारदर्शकता यावी, ऑनलाइन व्यवहारात वाढ व्हावी. तसेच दंड आकारण्यात सुलभता यावी यासाठी 
ई-चलन सेवा वापरात आली आहे. त्यानुसार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध ऑनलाईन कारवाई केली जाते. वाहनाचे चित्र काढून त्याचा पुरावा म्हणून वापर केला जातो. 

Web Title: crime one peson and penalty another one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.