Crime News : अल्नेश सोमजी दाम्पत्याला दिल्ली विमानतळावर अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 10:19 PM2021-11-01T22:19:45+5:302021-11-01T22:22:15+5:30

दिल्ली विमानतळावर ते इमिगेशनसाठी आले असताना दोघांना पकडण्यात आले, ते श्रीलंकेला पळून जात होते. याची माहिती मिळाल्यावर पुणे पोलिसांचे पथक आज दुपारी दिल्लीला पोहचले. त्यांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

Crime News: Alnesh Somji couple arrested at Delhi airport which is froud case | Crime News : अल्नेश सोमजी दाम्पत्याला दिल्ली विमानतळावर अटक

Crime News : अल्नेश सोमजी दाम्पत्याला दिल्ली विमानतळावर अटक

Next
ठळक मुद्देयाप्रकरणी योगेश विष्णू दीक्षित (वय ४१, रा. नाना पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार २१ ऑगस्ट २०१० पासून आतापर्यंत घडला आहे

पुणे : वार्षिक २४ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची ३ कोटी ३७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर परदेशात पळून जात असलेल्या सोमजी दाम्पत्याला दिल्लीविमानतळावर अटक करण्यात आली आहे.

अल्नेश अकील सोमजी आणि डिंपल अल्नेश सोमजी (रा. कोरेगाव पार्क) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सांगितले की, अल्नेश सोमजी व डिंपल सोमजी हे कोणत्याही प्रकारे तपासात सहकार्य करीत नसल्याने त्यांच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ते फरार होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस बजावण्यात आली होती. दिल्लीविमानतळावर ते इमिगेशनसाठी आले असताना दोघांना पकडण्यात आले, ते श्रीलंकेला पळून जात होते. याची माहिती मिळाल्यावर पुणे पोलिसांचे पथक आज दुपारी दिल्लीला पोहचले. त्यांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी योगेश विष्णू दीक्षित (वय ४१, रा. नाना पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार २१ ऑगस्ट २०१० पासून आतापर्यंत घडला आहे. सोमजी दाम्पत्याने फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला एम. जी. एंटरप्रायजेस या फर्ममध्ये पैसे गुंतविल्यानंतर, त्यावर २४ टक्के वार्षिक परतावा देईन असे आश्वासन दिले. फिर्यादी यांचे ६६ लाख ९० हजार रुपये गुंतवले होते. त्यापैकी काही रक्कम त्यांनी परत केली. त्याचबरोबर किरण शेट्टी व माया द्वारकादास चावला यांची अशी तिघांची मिळून एकूण ३ कोटी ३७ लाख ४८ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: Crime News: Alnesh Somji couple arrested at Delhi airport which is froud case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.