टँकर पुरवठाधारकांकडून होतोय भ्रष्टाचार : मनसेचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 11:42 AM2019-06-21T11:42:03+5:302019-06-21T11:47:29+5:30

पुणे पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या तीन गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी नेमलेल्या टँकर पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराकडून भलत्याच ठिकाणी पाणी पोचवले जात आहे.

Corruption by tanker suppliers : MNS allegation | टँकर पुरवठाधारकांकडून होतोय भ्रष्टाचार : मनसेचा आरोप

टँकर पुरवठाधारकांकडून होतोय भ्रष्टाचार : मनसेचा आरोप

googlenewsNext
ठळक मुद्देटँकर पॉईंट कर्मचाºयांची बदली करण्याची मागणीया भ्रष्टाचारात पालिकेचे अधिकारी सहभागी असल्याचा आरोप उच्चभ्रू सोसायट्या आणि मोठ्या कंपन्यांना चढ्या भावाने ग्रामस्थांच्या हक्काचे पाणी

पुणे : पालिकेच्या हद्दीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या तीन गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी नेमलेल्या टँकर पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराकडून भलत्याच ठिकाणी पाणी पोचवले जात आहे. उच्चभ्रू सोसायट्या आणि मोठ्या कंपन्यांना चढ्या भावाने ग्रामस्थांच्या हक्काचे पाणी विकून स्वत:च्या तुंंबड्या हे ठेकेदार भरत असून या भ्रष्टाचारात पालिकेचे अधिकारी सहभागी असल्याचा आरोप पालिकेतील मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. 
याबाबतच्या मागण्यांचे पत्र त्यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे. यावेळी नगरसेवक साईनाथ बाबर, खासगी टँकर मालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. मोरे म्हणाले, पालिकेने उरुळी देवाची, फुरसुंगी आणि शेवाळवाडी या गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवित टँकर सुरु केले. जाधव वॉटर टँकर आणि एन. वाय. शिवरकर या दोघांना याचा ठेका घेतला. रामटेकडी येथील पॉईंटवर टँकर भरुन ते तीन गावांमध्ये नागरिकांपर्यंत पोचविणे अपेक्षित आहे. परंतू, टँकर पॉईंटवरुन पाणी भरल्यानंतर हे टँकर उंड्री, एनआयबीएम येथील खासगी सोसायट्या आणि खराडीमधील मोठ्या कंपनीमध्ये नेण्यात आले. तेथे पाणी पोचविल्याच्या नोंदीही सुरक्षा रक्षकांच्या रजिस्टरमध्ये करण्यात आलेल्या आहेत. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या टँकर्सचा पाठलाग केल्यावर हा प्रकार उघडकीस आल्याचे मोरे म्हणाले. 
पालिकेचे पाणी फुकटात उचलून पाण्याचा पुरवठा केल्याचे पैसे घ्यायचे आणि हेच पाणी खासगी सोसायट्यांसह कंपन्यांना विकून तेथूनही पैसे कमवायचे असा गोरखधंदा सध्या सुरु आहे. टँकर पॉईंटवरील पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यामध्ये सामिल आहेत. त्यामुळे या टँकरच्या जीपीआरएसच्या नोंदी घेतल्या जात नाहीत. त्याउलट महापालिकेकडून पाणी विकत घेउन त्याची नियमानुसार विक्री करणाऱ्या खासगी टँकरचालकांना मात्र वेळेत पास दिले जात नाहीत. त्यांनी अधिकाऱ्यांच्या सुचनेवरुन जीपीएस सिस्टीम बसवूनही वरिष्ठ अधिकारी देशमुख नावाच्या व्यक्तिकडूनच पुन्हा नवीन जीपीएस यंत्रणा बसविण्यासाठी दबाव टाकत असल्याचे मोरे यांनी सांगितले. 
====
पालिका आयुक्तांनी या ठेकेदारांचे ठेके रद्द करावेत तसेच दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी मोरे यांनी केली आहे. टँकर पॉईंटवर वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करावी अन्यथा मनसे आणि खासगी टँकर मालक संघटनेच्या माध्यमातून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. 

Web Title: Corruption by tanker suppliers : MNS allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.