वारजे येथे नगरसेविकेने भेसळयुक्त ताडी रस्त्यावर ओतून केली नष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 12:35 PM2019-06-26T12:35:20+5:302019-06-26T20:55:00+5:30

अंदाजे ४०० ते ५०० बाटल्या भेसळ युक्त आढळली

Corporator destroyed liquor at Warje | वारजे येथे नगरसेविकेने भेसळयुक्त ताडी रस्त्यावर ओतून केली नष्ट

वारजे येथे नगरसेविकेने भेसळयुक्त ताडी रस्त्यावर ओतून केली नष्ट

Next
ठळक मुद्देया कारवाईत अंदाजे ४०० ते ५०० बाटल्या भेसळ युक्त ताडी नष्ट

पुणे: वारजे येथे मुंबई बेंगलोर महामार्ग सर्व्हिस रोड लगत असलेल्या पृथक बराटे उद्यानालगत अनधिकृत व बेकायदेशीर पद्धतीने राजरोसपणे भेसळयुक्त ताडी विक्री सुरु होती. गेल्या सात दिवसांपासून ताडी विक्री दुकानावर कारवाई करण्यासंबंधी संबंधी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार देऊन सुद्धा त्याची दखल न घेतल्यामुळे नगरसेविकेने बुधवारी भेसळयुक्त ताडी जमिनीवर ओतून नष्ट केली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे परिसरात सुरु असलेल्या ताडी विक्री संदर्भात गेले काही दिवस स्थानिक रहिवाशांबद्दल नाराजी होतो. त्यांनी हे दुकान बंद करण्याबाबत पोलिसांना वेळोवेळी निवेदन दिले होते.परंतु, पोलिसांकडून कुठल्याही हे प्रकरण गांभीर्याने घेतले जात नसल्याने या भागातील नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांच्या उपस्थित मंगळवारी रस्त्यावर ताडी ओतून नष्ट करण्यात आली. या कारवाईत अंदाजे ४०० ते ५०० बाटल्या भेसळ युक्त आढळली. ताडी विक्री दुकानातील कर्मचाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

पुणे महानगरपालिकेच्या उद्यानाच्या प्रवेशद्वारा समोरील रस्त्यावरच बेकायदा ताडी विक्री केली जात होती. याबाबत नागरिकांच्या मागणीवरून मागील आठवडाभर आम्ही तक्रार करूनही पोलिसांनी दखल घेतली नाही. त्यामुळे मंगळवारी आम्ही ताडी रस्त्यावर ओतून देत नष्ट केली. लक्ष्मी दुधाने, नगरसेविका  

 एका आठवड्यात (ता. १९ व ता.२५)  व्यावसायिकावर दोनदा कारवाई करून गुन्हा दाखल करत त्यास कोर्टासमोर उभे करण्यात आले आहे. त्यामुळे कारवाई  न करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कालही माहिती मिळाल्यावर आरोपी नामे जितेंद्र नरसिंग सारंगे व अशोक भंडारी (दोघे रा. धनकवडी) यांना अटक करून न्यायालयात सादर करण्यात आले. प्रकाश खांडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वारजे पोलीस ठाणे 

Web Title: Corporator destroyed liquor at Warje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.