coronavirus: बंदोबस्तासोबतच तुमचीही काळजी घ्या, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पोलिसांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 06:27 PM2020-06-07T18:27:42+5:302020-06-07T18:28:53+5:30

रवडा येथील पुणे महापालिकेच्या कोरोना  तपासणी केंद्राला गृहमंत्री देशमुख यांनी रविवारी दुपारी भेट दिली. यावेळी बंदोबस्तावर असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्याशी त्यांनी संवाद साधून विचारपूस देखील केली.

coronavirus: Take care of yourself along with duty, Home Minister Anil Deshmukh advises the police | coronavirus: बंदोबस्तासोबतच तुमचीही काळजी घ्या, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पोलिसांना सल्ला

coronavirus: बंदोबस्तासोबतच तुमचीही काळजी घ्या, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पोलिसांना सल्ला

Next

 येरवडा - राज्यात करोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव   लक्षात घेता स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहणाऱ्या पोलिसांनी बंदोबस्तावर स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घ्या अशी सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. येरवडा येथील पुणे महापालिकेच्या कोरोना  तपासणी केंद्राला गृहमंत्री देशमुख यांनी रविवारी दुपारी भेट दिली. यावेळी बंदोबस्तावर असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्याशी त्यांनी संवाद साधून विचारपूस देखील केली. येरवडा पोलीस स्टेशन येथील पोलीस शिपाई गोविंद कोळेकर, पोलीस मुख्यालय येथील पोलीस शिपाई तेजस कुंभार, महिला पोलीस कर्मचारी निशा शिंदे यांची  गृहमंत्री देशमुख यांनी चौकशी केली. पोलीस दलातील या कोरोना योध्या बरोबर संवाद साधताना सैनी टायझर वापरता का? मास्कचा वापर करा. आवश्यकता असल्यास तात्काळ तपासणी व योग्य ते औषधोपचार घ्या.बंदोबस्ताचे वेळी स्वतःची काळजी घ्या. अशा बहुमोल सूचना गृहमंत्र्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना केल्या. 

 यावेळी आमदार सुनील टिंगरे, माजी उपमहापौर व नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेवक अविनाश साळवे, अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल, अपर पोलिस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय चौधरी, लुंकड रिअल्टीचे अमित लुंकड, पोलीस निरीक्षक युनूस शेख,गुन्हे निरीक्षक अजय वाघमारे उपस्थित होते. पोलीस दलाचे प्रमुख व राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः आवर्जून चौकशी केल्यामुळे बंदोबस्तावरील पोलिस देखील काही वेळ भारावून गेले होते.

Web Title: coronavirus: Take care of yourself along with duty, Home Minister Anil Deshmukh advises the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.