Coronavirus Pune :दिल्लीहून खास विमानाने गुरुवारी पुणे जिल्ह्यासाठी आले फक्त ३५०० रेमडेसिविर इंजेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 03:11 PM2021-04-15T15:11:52+5:302021-04-15T15:13:02+5:30

पुणे जिल्ह्यात मागणी वाढत असताना ३५०० रेमडेसिविरचा हा पुरवठा पुरणार का..?

Coronavirus Pune : Only 3500 Remadecivir injections arrived in Pune on a special flight from Delhi on Thursday | Coronavirus Pune :दिल्लीहून खास विमानाने गुरुवारी पुणे जिल्ह्यासाठी आले फक्त ३५०० रेमडेसिविर इंजेक्शन

Coronavirus Pune :दिल्लीहून खास विमानाने गुरुवारी पुणे जिल्ह्यासाठी आले फक्त ३५०० रेमडेसिविर इंजेक्शन

googlenewsNext

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत आहे. याचवेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना रेमडेसिविरसाठी वणवण फिरावे लागत आहे. दिल्ली येथून थेट विशेष फ्लाईटने पुण्यात गुरुवारी दुपारी रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा आला. पण त्याची संख्या फक्त ३५०० इतकी आहे. त्यामुळे हा रेमडेसिविरची सध्याची मागणी पाहता आज मिळालेला साठा पुरेसा ठरणारा नाही. मात्र, आज रात्री आणखी रेमडेसिविरचा साठा पुण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे. 

शहरात बुधवारी दिवसभर रेमडेसिविर इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना प्रचंड वणवण करावी लागली.दरम्यान, पुण्यासाठी रेमडेसिविर उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा प्रशासन सतत प्रयत्नशील असून रात्री उशिरापर्यंत दिल्ली येथून थेट विशेष फ्लाईटने काही प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा पुण्यात येणार होता. मात्र तो आज दुपारी दाखल झाला.  

पुणे शहर आणि जिल्ह्यात सोमवार,मंगळवार या दोन दिवसांत १२ हजार ७९७ रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला. परंतु, दररोज रुग्णसंख्या  वाढतच असल्याने रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी देखील वाढतच आहे. सध्या अनेक खासगी हाॅस्पिटलकडून गरजेपेक्षा अधिक रेमडेसिविर इंजेक्शन वापर अधिक केला जात असून, यावर जिल्हा प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे. राज्याच्या तुलनेत गेले दोन दिवस पुणे जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा बऱ्यापैकी पुरवठा होत असताना बुधवारी सायंकाळपर्यंत मात्र पुण्यासाठी एकही रेमडेसिविर इंजेक्शन पुरवठा झाला नव्हता. 


जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, पुण्याला रेमडेसिविरचा जास्तीत जास्त पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्नशील आहोत. दिल्लीतून वैयक्तिक प्रयत्नानांनी हे डोस मिळवले आहेत.आता शासकीय पातळीवरून मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. तसेच आज रात्री नेमके किती डोस उपलब्ध होतील याचा अंदाज नाही. 

-----
कोरोनामध्ये रेमडेसिविर इंजेक्शन मिळाले नाही म्हणून आता पर्यंत एकाही रुग्णांचा मृत्यु झाला नाही, पण रुग्णाची परिस्थिती गंभीर आहे काही करून दोन तरी रेमडेसिविर इंजेक्शन तातडीने उपलब्ध करून द्या, अन्यथा तुमच्या पेशंटची जबाबदारी आम्ही घेणार नाही, असे सांगून सध्या काही हाॅस्पिटल  पेशंटच्या जिवाशी खेळत आहेत. तसेच काही हाॅस्पिटलकडून गरजेपेक्षा अधिक प्रमाणात पेशंटला रेमडेसिविर इंजेक्शनचा डोस दिला जात असल्याचे भरारी पथकातील एका अधिका-यांनी सांगितले.

Web Title: Coronavirus Pune : Only 3500 Remadecivir injections arrived in Pune on a special flight from Delhi on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.