CoronaVirus: ...अखेर मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अमृतांजन पूल झाला इतिहासजमा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 07:40 PM2020-04-05T19:40:32+5:302020-04-05T19:42:11+5:30

साधारणतः प्रत्येक खांबाला पायाजवळ 45 होल करण्यात आले होते. दिवसभर हे काम पूर्ण केल्यानंतर सायंकाळी सव्वासहा वाजता पूल पाडण्याकरिता स्फोट घडविण्यात आला. एकाच धमाक्यात सर्व पूल पत्त्यांसारखा खाली कोसळला.

CoronaVirus: pune Amritanjan bridge finally collaps vrd | CoronaVirus: ...अखेर मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अमृतांजन पूल झाला इतिहासजमा

CoronaVirus: ...अखेर मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अमृतांजन पूल झाला इतिहासजमा

Next

लोणावळा : रायगड व पुणे जिल्ह्याला जोडणारा ऐतिहासिक अमृतांजन पूल आज अखेर इतिहासजमा झाला. द्रुतगती मार्गाला अडथळा ठरणार्‍या पुलाच्या चारही खांबांना एकाच वेळी ब्लास्टिंग करून रविवारी सायंकाळी सव्वासहा वाजता स्फोट करून सदरचा पूल जमीनदोस्त करण्यात आला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून नियुक्त केलेल्या नवयुग टीमचे प्रमुख अनिल कुमार व टीमकडून हे काम आज फत्ते झाले. आज रविवारी सकाळपासून पुलाच्या दगडी खांबांमध्ये सुरुंगाची दारू भरण्याकरिता होल करण्याचे काम सुरू होते. साधारणतः प्रत्येक खांबाला पायाजवळ 45 होल करण्यात आले होते. दिवसभर हे काम पूर्ण केल्यानंतर सायंकाळी सव्वासहा वाजता पूल पाडण्याकरिता स्फोट घडविण्यात आला. एकाच धमाक्यात सर्व पूल पत्त्यांसारखा खाली कोसळला.

4 एप्रिल ते 14 एप्रिलदरम्यान हा पूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पाडण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. काल पुलावरील पाईपलाईन हलविल्यानंतर आज पुलाच्या खांबांना ब्लास्टिंगकरिता होल करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. याकरिता पुण्याकडे जाणारी सर्व वाहने अंडा पाँइट येथून जुन्या मार्गाने तर मुंबईकडे जाणारी वाहने लोणावळा एक्झिट येथून लोणावळा शहरातून वळविण्यात आली होती. ब्लास्टिंगच्या वेळी दोन्ही बाजूची वाहतूक थांबविण्यात आली होती. ब्रिटिशकाळात कोकण प्रांत हा दक्षिण महाराष्ट्राला जोडण्याकरिता ह्या पुलाची निर्मिती करण्यात आली होती.

सदर पूल धोकादायक झाल्याने त्याच्यावरून वाहतूक मागील काही वर्षांपासून बंद करण्यात आली होती. ह्या पुलाच्या खालून मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जातो, पुलामुळे मार्गावर वळण आले होते, तसेच रस्ता अरुंद झाला होता. यामुळे वारंवार या ठिकाणी अपघात घडत असल्याने तो वाहतुकीकरिता अडचणीचा ठरत होता. मागील तीन वर्षांपासून हा पूल पाडण्याच्या हालचाली सुरू होत्या, मात्र द्रुतगती मार्गावरील प्रचंड वाहतुकीमुळे ते शक्य होत नव्हते. सध्या भारतात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्याने लाॅकडाऊन आहे, त्यामुळे द्रुतगती मार्गावरील वाहतूक तुरळक असल्याने येत्या 4 एप्रिल ते 14 एप्रिलदरम्यान हा पूल पाडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आज पूल पाडण्यात आला असून पुढील, दोन दिवसात रस्त्यावरील मातीचे ढीग व दगड बाजूला केले जाणार आहेत.

Web Title: CoronaVirus: pune Amritanjan bridge finally collaps vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.