coronavirus : नीलम गोऱ्हे यांनी कोरोनावरील उपचार, साहित्य खरेदीसाठी पुणे महानगरपालिकेला दिला २० लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 11:12 PM2020-04-24T23:12:26+5:302020-04-24T23:12:58+5:30

गोऱ्हे यांनी त्यांच्या सन २०२०-२१ च्या स्थानिक आमदार निधी कार्यक्रमा अंतर्गत वीस लक्ष (२० लक्ष रु) निधी मंजूर करण्याचे प्रशासनास निर्देश दिले.

coronavirus: Neelam Gorhe donates Rs 20 lakh to Pune Municipal Corporation for treatment of corona and purchase of materials | coronavirus : नीलम गोऱ्हे यांनी कोरोनावरील उपचार, साहित्य खरेदीसाठी पुणे महानगरपालिकेला दिला २० लाखांचा निधी

coronavirus : नीलम गोऱ्हे यांनी कोरोनावरील उपचार, साहित्य खरेदीसाठी पुणे महानगरपालिकेला दिला २० लाखांचा निधी

googlenewsNext

पुणे -  कोरोना आजारावर उपचार करण्यासाठी राज्यातील सरकारी व महापालिकेचे हॉस्पिटल अहोरात्र काम करत आहेत. पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी ना.डॉ.गोऱ्हे यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्याअनुषंगाने स्थानिक आमदार विकास कार्यक्रम २०२०-२१ अंतर्गत निधीतून कोव्हीड-१९ वैद्यकीय यंत्र सामग्री व साहित्य करिता निधी देण्याचा निर्णय ना.डॉ.गोऱ्हे यांनी घेतला. पुणे महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये खालील साहित्य  खरेदीसाठी २० लक्ष  निधीची वितरित करण्याबाबत ना.डॉ.गोऱ्हे यांनी त्यांच्या सन २०२०-२१ च्या स्थानिक आमदार निधी कार्यक्रमा अंतर्गत वीस लक्ष (२० लक्ष रु) निधी मंजूर करण्याचे प्रशासनास निर्देश दिले. यानिधीतून  
*१. पीपीई युनिट साठी-- दहा लक्ष रु..(१० लक्ष रु), 
२. इन्फ्रारेड थर्मामिटर करिता-- दोन लक्ष रु.. (२ लक्ष रु), 
३. वैद्यकीय कर्मचारी करीता फेस मस्क, ग्लोव्हज व सॅनिटायझर--चार लक्ष रु.(४ लक्ष रु), 
४. कोरोना टेस्टिंग किट करिता -- चार लक्ष रु.(४ लक्ष रु)*हे साहित्य पुणे महानगरपालिकेतील हॉस्पिटलसाठी* खरेदी करण्यात येणार आहे. असे ना.डॉ.गोऱ्हे यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले.

Web Title: coronavirus: Neelam Gorhe donates Rs 20 lakh to Pune Municipal Corporation for treatment of corona and purchase of materials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.