Coronavirus : राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, एमपीएससीकडून २६ एप्रिलला घेतली जाणार परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 03:21 AM2020-03-23T03:21:29+5:302020-03-23T03:24:29+5:30

Coronavirus : कोरोनामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालयांसह सर्व अभ्यासिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांसमोर गावाकडील घरी जाण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही.

Coronavirus: Decision to postpone state service examination, MPSC exam to be held on April 7 | Coronavirus : राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, एमपीएससीकडून २६ एप्रिलला घेतली जाणार परीक्षा

Coronavirus : राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, एमपीएससीकडून २६ एप्रिलला घेतली जाणार परीक्षा

Next

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून प्रतिबंधक उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक हिताचाविचार करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत येत्या ५ एप्रिल रोजी आयोजित केलेली ‘राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०’ पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालयांसह सर्व अभ्यासिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांसमोर गावाकडील घरी जाण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही. परंतु, परीक्षा पुढे ढकलण्याबाबत आयोगाकडून अधिकृत घोषणा केली जात नाही; तोपर्यंत काही विद्यार्थ्यांनी पुण्यातच राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, हॉटेल्स, खानावळ बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे आयोगाने ५ एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी ‘एमपीएससी स्टुडेंट राईटस’ संघटनेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांनी केली होती. अखेर आयोगाने विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. तसेच ‘महाराष्ट्र दुप्पम सेवा अराजपत्रित गट-ब, संयुक्त पूर्व परीक्षा २०२०’ येत्या ३ मे एवजी १० मे रोजी घेतली जाणार आहे, असे आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणाºया उपाययोजना विचरात घेऊन, आयोगाकडून फेर आढावा घेतला जाणार आहे.

Web Title: Coronavirus: Decision to postpone state service examination, MPSC exam to be held on April 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.