Coronavirus : पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १७ वर ;  पिंपरीतील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 05:47 PM2020-03-17T17:47:54+5:302020-03-17T17:49:23+5:30

सरकारी कार्यालयांना सुट्टी असली तरी पुण्यात कोरोना विरोधात लढणारी सर्व यंत्रणा सुरू राहील.

Coronavirus : corona affected patient number about on 17 ; one report positive | Coronavirus : पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १७ वर ;  पिंपरीतील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह

Coronavirus : पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १७ वर ;  पिंपरीतील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देपरदेशगमन करून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला २४ तास विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार

पुणे : पुण्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत गेल्या २४ तासांत एक ने वाढ झाली आहे. नव्याने आढळून आलेला रुग्ण हा अमेरिकेतून दुबईमार्गे भारतात आला होता. संबंधित रुग्ण हा पिंपरी भागातील आहे,अशी माहिती पुणे जिल्हा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. 
कोरोनाच्या धर्तीवर पुण्यात विभागीय आयुक्तांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी म्हैसेकर बोलत होते. या परिषदेला जिल्हाधिकारी नवलकिशोर राम उपस्थित होते. म्हैसेकर म्हणाले, परदेशगमन करून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आता २४ तास विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. ते विलगीकरण कालावधीत घरी राहू शकतात किंवा आमच्याकडे राहतील 
घरी विलगीकरण कालावधीत असताना व्यक्ती बाहेर पडणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्यथा संबंधितांवर कारवाई करू. पुण्यात ५२० विलगीकरण क्षमता आहे.अजून २५० वाढवण्याची तयारी सुरू आहे.

*  सरकारी कार्यालयांना सुट्टी असली तरी पुण्यात कोरोना विरोधात लढणारी सर्व यंत्रणा सुरू राहील.
 

* शहरातील गर्दी टाळण्यासाठी आरटीओ कार्यालयाला आदेश 
 नवीन कोणतेही लायसन्स देऊ नयेत. नूतनीकरण करायचे असल्यास ते ऑनलाइन करावेत. 

उद्यापासून आधारकार्ड देण्यास स्थगिती. 
आधारकार्ड बायोमेट्रिक देत असल्याने तात्पुरते काम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ३१ मार्चपर्यंत आधार कार्डांचे वितरण नाही.


 

Web Title: Coronavirus : corona affected patient number about on 17 ; one report positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.