Corona virus : पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा वाढता मृत्यूदर चिंताजनक : नवल किशोर राम 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 12:12 PM2020-06-05T12:12:34+5:302020-06-05T12:16:18+5:30

ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित 

Corona virus : Worrying about Rising death rate of corona patients in Pune district : Naval Kishor Ram | Corona virus : पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा वाढता मृत्यूदर चिंताजनक : नवल किशोर राम 

Corona virus : पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा वाढता मृत्यूदर चिंताजनक : नवल किशोर राम 

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8 हजार 717, गुरुवारी 243 रुग्णांची भरगुरूवारी एकाच दिवसांत 13 रुग्णांचा मृत्यू 

पुणे : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढतच आहे. गुरूवारी एका दिवसांत 13 कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा मृत्यू झाला. तर नव्याने 243 रुग्णांची भर पडली.यामुळे आता पर्यंत जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8 हजार 717 झाली आहे. याबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले की सध्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा वाढता मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्व पातळीवर प्रशासन प्रयत्न करत आहे. 
पुणे जिल्ह्यात गुरुवारी 243 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले. तर 13 रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे आता पर्यंत एकूण 391 रुग्णाचे मृत्यू झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण पुणे शहरातील आहेत. परंतु गेल्या काही दिवसांत ग्रामीण भागात देखील रुग्ण वाढत आहेत. परंतु एखादा रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला वेळीच शोध घेऊन पुढे वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येला आळा घातला जात असल्याने ग्रामीण भागातील परिस्थिती नियंत्रणात आली असल्याची माहिती नवल किशोर राम यांनी सांगितले. 
---- 
एकूण बाधित रूग्ण : 8717
पुणे शहर : 7338
पिंपरी चिंचवड : 623
कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : 757
मृत्यु : 391

Web Title: Corona virus : Worrying about Rising death rate of corona patients in Pune district : Naval Kishor Ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.