Corona virus : कोविड-19 रुग्णांवर उपचार करण्यास नकार देणाऱ्यावर मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई होणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 11:45 AM2020-05-30T11:45:45+5:302020-05-30T11:48:52+5:30

शहरातील खासगी हॉस्पिटलमधील 80 टक्के बेड महापालिकेकडून आरक्षित करण्यात येणार

Corona virus : Those who refuse to treatment of covid-19 patients will be prosecuted under the Mesma Act | Corona virus : कोविड-19 रुग्णांवर उपचार करण्यास नकार देणाऱ्यावर मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई होणार 

Corona virus : कोविड-19 रुग्णांवर उपचार करण्यास नकार देणाऱ्यावर मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई होणार 

Next
ठळक मुद्देशहरातील खासगी हॉस्पिटलकडून मागविला तपशीलडॅश बोर्डवर दररोज अचूक व वेळेत उपलब्ध करून देणे बंधनकारक राहणार

पुणे : कोरोनाचा शहरातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, शहरातील खासगी हॉस्पिटलमधील 80 टक्के बेड महापालिकेकडून आरक्षित करण्यात येणार आहेत. हे बेड आरक्षित झाल्यावर कोविड- 19 रुग्णांवर उपचार करण्यास नकार देणाऱ्या डॉक्टर्स, नर्स व इतर संबंधित करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
 याबाबत पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी शहरातील सर्व खाजगी हॉस्पिटल प्रशासनास अधिसूचनेद्वारे कळविले आहे. यामध्ये खासगी हॉस्पिटलने आपल्या कडील सर्व बेड ची माहिती, उपलब्ध डॉक्टर, नर्स व आदी वैद्यकीय सेवक वर्गाची माहिती लेखी स्वरूपात मागविली आहे. दोन दिवसात ही माहिती संकलित करून, सोमवारपासून बेड आरक्षित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. 
             ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रत्येक खासगी हॉस्पिटलने कोविड-19 रुग्णांवर दैनंदिन स्वरूपात केल्या जाणाऱ्या उपचारांची 80 टक्के बेडस बाबतची अद्ययावत माहिती महापालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या डॅश बोर्डवर दररोज सकाळी 10.30 व संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत अचूक व वेळेत उपलब्ध करून देणे बंधनकारक राहणार आहे.

Web Title: Corona virus : Those who refuse to treatment of covid-19 patients will be prosecuted under the Mesma Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.