Corona virus : पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी दोन हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 01:19 PM2020-09-08T13:19:05+5:302020-09-08T13:20:13+5:30

१ हजार ६३९ कोरोनाबाधित कोरोनामुक्त 

Corona virus : For the second day high number of corona patients has increased in Pune | Corona virus : पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी दोन हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची वाढ

Corona virus : पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी दोन हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची वाढ

Next
ठळक मुद्देशहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ९१२ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू

पुणे : पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशीही दोन हजाराहून अधिक कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, आज दिवसभरात २ हजार ५३ जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. तर दिवसभरात विविध रूग्णालयातून १ हजार ६३९ कोरोनाबाधित कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत़ 
          पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ९१२ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी ४८० व्हेंटिलेटरवर, ४३२ आयसीयू मध्ये तर ३ हजार ३०६ जणांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू होते. आज दिवसभरात ६९ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २२ जण पुण्याबाहेरील आहेत.
      शहरात आजपर्यंत एकूण कोरोनाबधित संख्या १ लाख ७ हजार ९५८ झाली असून, आतापर्यंत ८८हजार ५७९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर २ हजार ५४९ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या १६ हजार ८३०  झाली आहे़
      आज  दिवसभरात ३ हजार ३५४ जणांची तपासणी करण्यात आली असून, कोरोनाची तपासणी करणाºयांची एकूण संख्या  शहरात ४ लाख ९४ हजार ७७१ इतकी झाली आहे.

Web Title: Corona virus : For the second day high number of corona patients has increased in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.