Corona virus Pune : पुणे शहरात गुरूवारी ३३४ नवे कोरोनाबाधित : २१२ जणांची कोरोनावर मात 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 08:10 PM2021-07-15T20:10:31+5:302021-07-15T20:11:18+5:30

शहरातील सक्रिय रूग्णसंख्या गुरूवारी पुन्हा ३ हजाराच्या पुढे गेली.

Corona virus Pune: 334 new corona patients and 212 people beat corona in Pune on Thursday | Corona virus Pune : पुणे शहरात गुरूवारी ३३४ नवे कोरोनाबाधित : २१२ जणांची कोरोनावर मात 

Corona virus Pune : पुणे शहरात गुरूवारी ३३४ नवे कोरोनाबाधित : २१२ जणांची कोरोनावर मात 

Next

पुणे : शहरात गुरूवारी ३३४ कोरोनाबाधित आढळून आले असून, २१२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ६९६ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ४़३३ टक्के इतकी आढळून आली आहे. 

शहरातील सक्रिय रूग्ण संख्या गुरूवारी पुन्हा ३ हजाराच्या पुढे गेली असून, आज शहरात ३ हजार ३३ जण सक्रिय रूग्ण आहेत. दिवसभरात १० जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ४ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १. ७९ टक्के इतका आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २२५ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ५१३ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २७ लाख ६२ हजार ६७२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८२ हजार ९१६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७१ हजार २०९ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ६७४ जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Corona virus Pune: 334 new corona patients and 212 people beat corona in Pune on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.