Corona virus Pune : पुणे शहरात बुधवारी २८३ नवे कोरोनाबाधित तर २५५ जण कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 08:14 PM2021-06-23T20:14:13+5:302021-06-23T20:14:22+5:30

शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही ३३१ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ४६४ इतकी आहे.

Corona virus Pune: 283 new corona infected and 255 corona free in Pune on Wednesday | Corona virus Pune : पुणे शहरात बुधवारी २८३ नवे कोरोनाबाधित तर २५५ जण कोरोनामुक्त

Corona virus Pune : पुणे शहरात बुधवारी २८३ नवे कोरोनाबाधित तर २५५ जण कोरोनामुक्त

Next

पुणे : शहरात बुधवारी २८३ कोरोनाबाधित आढळून आले असून, २५५ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत शहरात २ हजार ३७५ सक्रिय रुग्ण आहेत. आज नव्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रथमच कमी आढळून आले आहे. गेल्या तीन महिन्यात असे प्रथमच घडले असून, सातत्याने कमी होणारी सक्रिय रूग्ण संख्याही कालच्या तुलनेत २१ ने वाढली आहे़ 

आज विविध तपासणी केंद्रांवर ५ हजार ४३७ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ५़२० टक्के इतकी आहे. आज १६ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ९ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.७९ टक्के इतका आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही ३३१ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ४६४ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २६ लाख २९ हजार ९९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७६ हजार ४९३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ६५ हजार ५६९ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ५४९ जणांचा मृत्यू झाला आहे.

--------

Web Title: Corona virus Pune: 283 new corona infected and 255 corona free in Pune on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.