पुणे पालिकेची ८ कोविड केअर सेंटर बंद करण्यात येणार; रूग्ण स्वीकारताहेत ‘होम आयसोलेशन’चा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 07:53 PM2020-08-12T19:53:53+5:302020-08-13T00:09:10+5:30

बहुतांशी रूग्ण हे ‘होम आयसोलेशन’ चा पर्याय स्विकारत असल्याने,महापालिकेचे अनेक कोविड केअर सेंटर रिक्त होऊ लागले आहेत.

Corona virus : PMC'S eight Covid Care Centers will be closed | पुणे पालिकेची ८ कोविड केअर सेंटर बंद करण्यात येणार; रूग्ण स्वीकारताहेत ‘होम आयसोलेशन’चा पर्याय

पुणे पालिकेची ८ कोविड केअर सेंटर बंद करण्यात येणार; रूग्ण स्वीकारताहेत ‘होम आयसोलेशन’चा पर्याय

Next
ठळक मुद्दे पुणे महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात २१ ठिकाणी उभे केले होते कोविड केअर सेंटर

पुणे : कोरोना संसर्ग झालेले बहुतांशी रूग्ण हे ‘होम आयसोलेशन’ चा पर्याय स्विकारत असल्याने, महापालिकेचे बहुतांशी कोविड केअर सेंटर रिक्त होऊ लागले आहेत. यामुळे सद्यस्थितीला महापालिकेने आठ कोविड केअर सेंटर तात्परुत्या काळापुरते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
    शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णवाढही पूर्वीपेक्षा कमी प्रमाणात होत आहे. तर कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या अनेक रूग्णांना ‘होम आयसोलेशन’ चा पर्याय महापालिकेने उपलब्ध करून दिला असल्याने, अनेक जण कोविड केअर सेंटरमध्ये राहण्यापेक्षा घरी जाणे पसंत करीत आहेत. यामुळे शहरातील २१ कोविड केअर सेंटर पैकी बहुतांशी ठिकाणी ५० टक्केच कोविडचे रूग्ण राहत आहेत. तर काही ठिकाणी सेंटरच्या एकूण क्षमतेच्या पाच दहा टक्केही रूग्ण नाहीत. परिणामी अशी आठ कोविड केअर सेंटर काही काळापुरती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे. या आठ कोविड केअर सेंटरमध्ये प्रामुख्याने सिंहगड कॉलेजची एक पूर्ण बिल्डिींग, संत ज्ञानेश्वर हॉस्टेल यांचा समावेश आहे. 
    पुणे महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात २१ ठिकाणी कोविड केअर सेंटर उभे केले होते. यामध्ये साधारणत: १२ हजार बेड ची (रूग्ण क्षमता) क्षमता आहे. परंतु, होम आयसोलेशन मुळे हजारो रूग्ण घरी गेल्याने,  ५ हजार खाटांची क्षमता असलेले ८ कोविड केअर सेंटर काही काळापुरते बंद करण्यात येणार आहेत. 
                                    

Web Title: Corona virus : PMC'S eight Covid Care Centers will be closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.