Corona virus News : पाच महिन्यांनी ससूनमधील रुग्ण शंभरच्या आत; डॉक्टर व परिचारिकांवरील ताण झाला कमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 11:59 AM2020-10-14T11:59:50+5:302020-10-14T12:01:34+5:30

परिचारिका, डॉक्टरांचा सुस्कारा

Corona virus News : Within a hundred patients in Sassoon after five months; The stress on doctors and nurses was reduced | Corona virus News : पाच महिन्यांनी ससूनमधील रुग्ण शंभरच्या आत; डॉक्टर व परिचारिकांवरील ताण झाला कमी 

Corona virus News : पाच महिन्यांनी ससूनमधील रुग्ण शंभरच्या आत; डॉक्टर व परिचारिकांवरील ताण झाला कमी 

Next

पुणे : मागील सात महिन्यांत खऱ्या अर्थाने 'जम्बो' रुग्णालय ठरलेल्या ससून रुग्णालयातील कोविड सेंटरमधील रुग्णसंख्या शंभरच्या खाली आली आहे. मागील पाच महिन्यांत पहिल्यांदाच एवढी सुसह्य स्थिती निर्माण झाल्याने येथील डॉक्टर व परिचारिकांवरील ताण कमी झाला आहे. मंगळवार (दि. १३) पर्यंत रुग्णालयात एकुण ४ हजार ३५८ कोरोनाबाधित रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी २ हजार ५८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

ससून रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाबाधित रुग्ण दाखल होण्यास सुरूवात झाली. त्यानंतर १५ दिवसांतच ११ मजली नवीन इमारतीत कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले. तेव्हापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत ससूनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच गेली. जवळपास ४५० हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू होते. त्याचबरोबर सारी व अन्य श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांवरही कोविड केंद्रात उपचार सुरू होते. त्यामुळे एकुण रुग्णांचा आकडा ५०० च्या पुढे होता. परिणामी, रुग्णालयातील परिचारिका, डॉक्टर व संपुर्ण यंत्रणेवरच मोठा ताण पडला होता. तज्ज्ञ डॉक्टर व परिचारिका मिळविणेही कठीण जात होते.

रुग्णालयात २० मे ला रुग्णांचा आकडा शंभरीच्या पुढे गेला. त्यानंतर तीन महिन्यांत ४०० च्या पुढे रुग्ण झाले. पुढील महिनाभर ४०० ते ४५० दरम्यान कोरोनाबाधित रुग्ण ससूनमध्ये उपचार घेत होते. त्यानंतर २४ सप्टेंबरला पहिल्यांदाच रुग्णसंख्या ४०० च्या खाली आली. तर पुढील १५ दिवसांत हा आकडा शंभरच्याही खाली आला. बाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने ससूनप्रमाणेच अन्य रुग्णालयांवरीलही ताण कमी होत आहे. पण ससून रुग्णालयात आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण उपचार घेत होते.
--------------
ससून कोविड केंद्रातील मंगळवारची स्थिती
कोरोनाबाधित रुग्ण - ८४
सारी व अन्य आजार - २२
व्हेंटिलेटरवरील - ४४
अन्य आजार असलेले - १९
एकुण घरी सोडलेले - २,५८८
एकुण बाधित दाखल - ४,३५८
एकुण संशयित दाखल - १९,२२९
------------------------------
बाधित रुग्णांचे टप्पे
रुग्णांमध्ये वाढ
२० मे - १०८
१२ जुलै - २१०
३ ऑगस्ट ३०४
२४ ऑगस्ट - ४१७
------------------
रुग्णसंख्या कमी
२४ सप्टेंबर - ३९३
१ ऑक्टोबर - २३४
३ ऑक्टोबर १८७
११ ऑक्टोबर ९४
-------------------

Web Title: Corona virus News : Within a hundred patients in Sassoon after five months; The stress on doctors and nurses was reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.