Corona virus : पुणे विभागात एकाच दिवसांत 186 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ; 10 रूग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 07:47 PM2020-05-06T19:47:04+5:302020-05-06T20:09:47+5:30

आजपर्यंत विभागामधील 78 लाख 94 हजार 830 घरांचे सर्वेक्षण पूर्ण.

Corona virus : An increase of 186 new corona positive patients in a single day in Pune division | Corona virus : पुणे विभागात एकाच दिवसांत 186 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ; 10 रूग्णांचा मृत्यू

Corona virus : पुणे विभागात एकाच दिवसांत 186 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ; 10 रूग्णांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देपुणे विभागातील 673 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन गेले घरी

पुणे : पुण्यासोबतच आता सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात देखील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. पुणे विभागात मंगळवारी सायंकाळी 4 ते बुधवार (दि.6) सायंकाळी 4 या चोवीस तासांमध्ये तब्बल 186 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढ झाली आहे, तर 10 रूग्णांचा कोरोनामुळे बळी देखील गेला आहे. यामध्ये सर्वाधिक वाढ अर्थातच पुणे जिल्ह्यात 165, सोलापूर 10 , सातारा 10 सांगली जिल्ह्यात एका नवीन रूग्णांची भर पडली आहे . तर कोल्हापूर जिल्ह्यात नवीन रूग्ण वाढला नाही. तर गेल्या 24 तासांमध्ये विभागात मृत्यु होणाऱ्या रूग्णांची संख्या देखील वाढली असून एका दिवसांत 10 रूग्णांनी आपला जीव गमावला आहे. 
पुणे विभागातील 673 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 574 वर जाऊन पोहचली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 764 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 137 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 93 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
    यापैकी पुणे जिल्हयातील 2 हजार 287 बाधीत रुग्ण असून 608 कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेलेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 555 आहे. कोरोनाबाधित एकूण 124 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 86 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. 
    सातारा जिल्हयात 92 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 145 बाधीत रुग्ण असून 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 35 बाधीत रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 15 बाधीत रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
    आजपर्यत विभागामध्ये एकुण 26 हजार 326 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 25 हजार 4 चा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 1 हजार 322 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 22 हजार 106 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 2 हजार 574 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
    आजपर्यंत विभागामधील 78 लाख 94 हजार 830 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 3 कोटी 12 लाख 96 हजार 465 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.    

----:
पुणे विभागाची माहिती
जिल्हा कोरोना    रूग्ण     मृत्यु 
पुणे                    2287      124
सातारा               92           02
सोलापूर              145         09
सांगली               35           01
कोल्हापूर            15             01
एकूण                2574         137

 

Web Title: Corona virus : An increase of 186 new corona positive patients in a single day in Pune division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.