Corona virus : अबब! पुणे शहरात गुरुवारी दिवसभरात सर्वाधिक ९३७ कोरोनाबाधित, एकूण रुग्णसंख्या १९ हजार ४२

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 10:02 AM2020-07-03T10:02:00+5:302020-07-03T14:44:03+5:30

विविध रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांपैकी ३४४ जण अत्यवस्थ

Corona virus : Highest increase of 937 corona patients during the day on Thursday | Corona virus : अबब! पुणे शहरात गुरुवारी दिवसभरात सर्वाधिक ९३७ कोरोनाबाधित, एकूण रुग्णसंख्या १९ हजार ४२

Corona virus : अबब! पुणे शहरात गुरुवारी दिवसभरात सर्वाधिक ९३७ कोरोनाबाधित, एकूण रुग्णसंख्या १९ हजार ४२

Next
ठळक मुद्देतब्बल ६३१ रुग्ण झाले बरे,आजारातून बरे झालेल्यांची ११ हजार ६७१

पुणे : शहरातील कोरोना रुग्णांमध्ये आजवरची सर्वाधिक ९३७ ची वाढ झाली असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा १९ हजार ४२ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या ६३१ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३४४ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात ऍक्टिव्ह रुग्ण ६ हजार ६९५ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. 
गुरुवारी रात्री साडेदहापर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ९३७ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १२, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ६७२ तर खासगी रुग्णालयांमध्ये २५३ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३४४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५६ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून २८८ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. 
शहरात गुरूवारी १४ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ६७६ झाली आहे. दिवसभरात एकूण ६३१ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील ३३६ रुग्ण, ससूनमधील १६ तर  खासगी रुग्णालयांमधील २७८ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ११ हजार ६७१ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या ६ हजार ६९५ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ४ हजार १४० नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १ लाख २४ हजार १९८ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
...............

एकूण बाधित रूग्ण : २४९४४
पुणे शहर : १९०११
पिंपरी चिंचवड : ३८५०
कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : २०८३
मृत्यु : ८०६

Web Title: Corona virus : Highest increase of 937 corona patients during the day on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.