Corona virus : कोरोना लॉकडाऊनच्या धर्तीवर न्यायालयीन कामकाज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 08:19 PM2020-04-08T20:19:52+5:302020-04-08T20:44:52+5:30

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे आता जिल्हा न्यायालयात देखील या व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे कामकाज सुरु

Corona virus : Court work is Proceedings via video conference in Corona lockdown | Corona virus : कोरोना लॉकडाऊनच्या धर्तीवर न्यायालयीन कामकाज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुरू 

Corona virus : कोरोना लॉकडाऊनच्या धर्तीवर न्यायालयीन कामकाज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुरू 

googlenewsNext
ठळक मुद्दे न्यायालयाच्या कामासाठी वकील,पक्षकार,त्यांचे नातेवाईक,लेखनिक यांची न्यायालयात गर्दी जामीन अर्जाची सुनावणी,रिमांड सुनावणी यासाठी वकील व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे युक्तिवाद

अमोल यादव- 
बारामती : कोरोना लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच क्षेत्र बंद करण्यात आले आहे. देशात कोरोनाच्या संसर्गजन्य विषाणू मुळे सोशल मीडिया, आय टी कंपनी,शाळा,खासगी कंपन्यांनी गर्दी टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना कार्यालयात न येता घरी बसुन कामकाज करायला सांगितले आहे.त्याच धर्तीवर महत्वाच्या असणाऱ्या न्यायालयाचे कामकाज देखील आता जिल्हा न्यायालयाने व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे कामकाज सुरू केले आहे.
कोरोनासारख्या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी एकत्र येऊ नये. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे आता जिल्हा न्यायालयात देखील या व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे कामकाज सुरु झाले आहे. आता वकील आपल्या कार्यालयात बसुन जामीन अर्जाची सुनावणी,रिमांड सुनावणी यासाठी वकील व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे युक्तिवाद करीत आहेत.त्यामुळे सध्या कोरोना सारख्या भयानक संसर्ग असताना देखील न्यायालयाच्या कामासाठी वकील,पक्षकार,त्यांचे नातेवाईक,लेखनिक यांची न्यायालयात गर्दी होते. मात्र आता व्हिडीओ कॉन्फरन्स मुळे यांना न्यायालयात येण्याची गरज नाही.परीणामी न्यायालयात गर्दी टाळणे शक्य आहे. गर्दी नसल्याने न्यायालयात देखील सोशल डिस्टन्स पाळला जातो आहे. सध्या सुरू असणा  लॉकडाऊनमुळे व कोरोना संसर्गाच्या खबरदारी साठी वकील घरातून बाहेर पडणे टाळत आहे.त्यातुन  कैदेत असणाऱ्या आरोपींचा मुक्काम देखील वाढला आहे. यावर उपाय म्हणून न्यायालयाकडून वकिलांना वेळ दिली जात आहे.  त्यावेळी  वकिलांकडून व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे युक्तिवाद केला जातो आहे.जिल्हा न्यायालयात मागील पंधरा दिवसांपासून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कामकाज सुरू आहे. यामुळे कोरोना सारख्या सांसगामुर्ळे न्यायालयात गर्दी होत नाही.व्हीडीओ कॉन्फरन्स द्वारे गर्दी टाळणे शक्य झाले आहे. 
 ——————————————————
सध्या व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे न्यायालयीन कामकाज होत आहे. यासाठी घेतला जाणारा देखील व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे  होत असल्याने न्यायालयातील गर्दी कमी होत आहे.  कामकाज सुरळीत पार पडत आहे.
अ‍ॅड. चंद्रकांत सोकटे, अध्यक्ष, बारामती वकील संघटना
—————————————
 सहा एप्रिल पासुन सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील प्रत्येक जिल्हा न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे न्यायालयाचे  कामकाज करण्यास सांगितले आहे.त्यामुळे वकिलांना कोरोनाच्या धर्तीवर न्यायालयात न जाता कार्यालयातून कामकाज करता येत आहे.
अ‍ॅड. भार्गव पाटसकर 

Web Title: Corona virus : Court work is Proceedings via video conference in Corona lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.