Corona virus : पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा धोका वाढला ; नागरिकांनी घराबाहेर पडू नये 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 02:42 PM2020-04-07T14:42:57+5:302020-04-07T14:46:18+5:30

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या चार-पाच दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

Corona virus : Corona risk increased in Pune and Pimpri Chinchwad; Citizens should not leave the house | Corona virus : पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा धोका वाढला ; नागरिकांनी घराबाहेर पडू नये 

Corona virus : पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा धोका वाढला ; नागरिकांनी घराबाहेर पडू नये 

Next
ठळक मुद्देविभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांचे आवाहन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे स्मार्ट सिटी कमांण्ड कंट्रोल सेंटर म्हैसेकर व जिल्हाधिकारी यांची भेट

पुणे : गेल्या चार-पाच दिवसांत पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे या दोन्ही ठिकाणी कोरोना धोका अधिक वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे स्मार्ट सिटी कमांण्ड कंट्रोल सेंटर म्हैसेकर व जिल्हाधिकारी यांनी भेट दिली. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त व पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपायुक्त राजेंद्र मुठे आदी अधिकारी उपस्थित होते.
कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या वतीने आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत उपस्थित अधिकाऱ्यांनी चर्चा करुन योग्य ते निर्णय घेण्यात आले. डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले,पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने नागरिकांनी घरी राहून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. तर नवल किशोर राम यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासन योग्य ती पावले उचलत असून अत्यावश्यक सेवा-सुविधा पुरवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये. डॉ. के. व्यंकटेशम यांनी लॉकडाऊनच्या परिस्थितीत पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.
शेखर गायकवाड यांनी पुण्यातील कोरोना संशयित, पॉझिटिव्ह रुग्ण, हॉस्पिटलच्या वैद्यकीय सेवा-सुविधा आदींबाबत माहिती दिली.पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने कोविड संबंधी एकात्मिक डॅशबोर्ड विकसित करण्यात आला असून, त्याअंतर्गत दैनंदिन माहिती अद्ययावत आणि मॅपिंग करण्यात येत असून, त्याचा प्रशासकीय निर्णय घेण्यात महत्त्वपूर्ण उपयोग होत असल्याचे, आयुक्त गायकवाड व रुबल अग्रवाल यांनी सांगितले. बैठकीत कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय साधनसामुग्री, उपलब्ध साधनसामुग्री, पीपीई किट, औषधसाठा तसेच रुग्णांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवा व डॉक्टरांसाठीच्या आवश्यक सुविधा आदीं विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

Web Title: Corona virus : Corona risk increased in Pune and Pimpri Chinchwad; Citizens should not leave the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.