Corona virus : रुग्णांच्या आकड्यातील घोळ सुरूवातीपासूनच; जूननंतर हजाराने फरक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 10:47 AM2020-07-27T10:47:07+5:302020-07-27T10:47:44+5:30

पुण्याच्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीतील घोळ, अ‍ॅक्टिवसह बाधितांचा आकड्यातही तफावत

Corona virus : Confusion in patient numbers from the beginning; Thousands of different after June | Corona virus : रुग्णांच्या आकड्यातील घोळ सुरूवातीपासूनच; जूननंतर हजाराने फरक

Corona virus : रुग्णांच्या आकड्यातील घोळ सुरूवातीपासूनच; जूननंतर हजाराने फरक

Next
ठळक मुद्देप्रशासनाने सुरूवातीपासूनच दुर्लक्ष केल्याने देशपातळीवर पुणे ‘हॉटस्पॉट’ बनलल्याचे चित्र

पुणे : राज्य व जिल्हा आरोग्य विभागाच्या कोरोना अहवालातील घोळ मागील काही दिवसांतील नसून सुरूवातीपासूनच असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. अगदी शेकड्यामध्ये रुग्णसंख्या असतानाही दोन्ही यंत्रणांमध्ये ताळमेळ नव्हता. बाधितांच्या आकड्यांमध्येही शेकड्याने तफावत आढळून येत होती. ही स्थिती अद्यापही कायम असून आता आकड्यांमधील तफावत काही हजारांच्या घरात गेली आहे. या फरकाकडे जिल्हा व पालिका प्रशासनाने सुरूवातीपासूनच दुर्लक्ष केल्याने देशपातळीवर पुणे ‘हॉटस्पॉट’ बनलल्याचे चित्र आहे.  
राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण दि. ९ मार्च रोजी पुण्यात आढळून आला. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरूवातीला रुग्णांचा आकडा १०० च्या आत होता. त्यामुळे राज्य व जिल्ह्याच्या आकड्यांमध्ये फारशी तफावत नव्हती. पण रुग्णसंंख्या वाढत गेल्यानंतर दोन्ही यंत्रणांकडील संख्येतही फरक पडत गेला. दि. २० एप्रिल रोजी राज्याकडे ५८८ तर जिल्ह्याकडे ७५६ बाधितांची नोंद होती. संपुर्ण एप्रिल व मे अखेरपर्यंत जिल्ह्याच्या अहवालातील बाधितांपेक्षा राज्याकडील बाधितांची संख्या कमी दाखविली जात होती. राज्याच्या अहवालामध्ये दि. २७ मे पासून अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्या देण्यास सुरूवात केल्यानंतर त्यातही तफावत दिसू लागली. मात्र, हा आकडा जिल्ह्याच्या तुलनेत जास्त होता. त्यामध्ये आजअखेरपर्यंत सातत्याने वाढच होत गेली.
जुलै महिन्यात रुग्णसंख्ये वेगाने वाढ होत गेल्याने दोन्ही अहवालांमध्ये बाधितांच्या तुलनेत अ‍ॅक्टिव रुग्णांमधील तफावतही वेगाने पडत गेल्याचे आकडेवारीवरून दिसते. ही तफावत शनिवारपर्यंत दुप्पट आहे. मागील १५ ते २० दिवसांतच ही तफावत मोठ्या प्रमाणावर वाढत गेल्याचे दिसते. पण यंत्रणांकडून सुरूवातीपासूनच त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने जुलै महिन्यातही फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. 
----------

राज्य व जिल्ह्याच्या अहवालातील फरक
                          राज्य                                        जिल्हा
       बाधित   अ‍ॅक्टिव                                      बाधित      अ‍ॅक्टिव
२० ए. ५८८     -                                              ७५६          ६२२
१ मे   १३१६    -                                             १८१५        १३५५
२५ मे ५९९६।   -                                             ६१५३       २६७८
१० जून १०४०६ ३८८८                                    १०३९४     ३२६३
१ जुलै २३३१७ १०९८९                                  २३६८०।     ८३९८
१० जुलै ३५२३२ १८६८०                                ३५९९७    १२७८३
२० जुलै ५७०२४ ३५३१२                                ५४०१३    १८२१५
२५ जुलै ७३००७ ४६०१३                               ६६९६५।   २३९२७
--------------------------------------------------------
बाधितांमध्ये तफावत कशी?
प्रयोगशाळांना बाधित रुग्णांची माहिती भरण्यासाठी स्वतंत्र लिंक देण्यात आली आहे. ही माहिती त्यांच्याकडून भरली जाते. त्यावेळी प्रत्येक रुग्णाचा युनिक आयडी तयार होतो. त्यानंतर जिल्हा व पालिका प्रशासनाकडेही त्याची माहिती येते. रुग्णालये व कोविड सेंटरकडून युनिक आयडीच्या आधारावरच रुग्णाची माहिती अद्ययावत करणे अपेक्षित असते. हीच माहिती राज्य आरोग्य विभागाकडून ही माहिती कोविड पोर्टलवरून घेतली जाते. असे असताना राज्य व जिल्हा प्रशासनाकडून बाधित रुग्णांच्या आकड्यांमध्येही तफावत आढळून येत असल्याने यंत्रणेतील कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
----------------

Web Title: Corona virus : Confusion in patient numbers from the beginning; Thousands of different after June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.