Corona virus : दिलासाजनक! पुणे शहरात दिवसभरात १९६१ कोरोना रुग्ण झाले बरे; १२९० नव्या रूग्णांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 10:00 PM2020-08-08T22:00:24+5:302020-08-08T22:02:43+5:30

विविध रुग्णालयात उपचार घेणारे ७१७ जण अत्यवस्थ, ३७ जणांचा मृत्यू

Corona virus : Comfortabale! 1961 patients was recovred from Corona in a day in Pune city; An increase of 1290 new patients | Corona virus : दिलासाजनक! पुणे शहरात दिवसभरात १९६१ कोरोना रुग्ण झाले बरे; १२९० नव्या रूग्णांची वाढ

Corona virus : दिलासाजनक! पुणे शहरात दिवसभरात १९६१ कोरोना रुग्ण झाले बरे; १२९० नव्या रूग्णांची वाढ

Next
ठळक मुद्देसक्रिय रुग्णसंख्या १६ हजार ३२५ आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४६ हजार ७३५

३७ जणांचा मृत्यणे

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत शनिवारी १ हजार २९० रूग्णांची भर पडली असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ६४ हजार ५७६ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या १ हजार ९६१ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ७१७ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १६ हजार ३२५ झाली आहे. 

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ७१७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४४३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून २७४ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, २ हजार ३१८ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.

दिवसभरात ३७  मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ हजार ५१६  झाली आहे. दिवसभरात एकूण १ हजार ९६१ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४६ हजार ७३५ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १६ हजार ३२५ झाली आहे.

-------------

दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ५ हजार ५१ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ३ लाख १३ हजार ५८० रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

 

Web Title: Corona virus : Comfortabale! 1961 patients was recovred from Corona in a day in Pune city; An increase of 1290 new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.