Corona virus : खेड तालुक्यात आज ४ नवीन कोरोनाग्रस्तांची वाढ ; रुग्णांची संख्या पोहचली १९ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 09:10 PM2020-05-27T21:10:33+5:302020-05-27T21:11:38+5:30

दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

Corona virus : 4 more corona victims in Khed taluka today; The number of patients reached 19 | Corona virus : खेड तालुक्यात आज ४ नवीन कोरोनाग्रस्तांची वाढ ; रुग्णांची संख्या पोहचली १९ वर

Corona virus : खेड तालुक्यात आज ४ नवीन कोरोनाग्रस्तांची वाढ ; रुग्णांची संख्या पोहचली १९ वर

Next

राजगुरुनगर.: खेड तालुक्यात आज (दि२७ मे ) दिवसभरात ४ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १९ वर पोहचली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
     खेड तालुक्यातील मुंबईतुन आलेले रुग्ण वाढु लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण तयार होऊ लागले. कुरकुंडी येथील ३ आणि वडगाव पाटोळे येथील २ असे पाच जण मुबंईहुन ज्या वाहनातुन आले.त्या पाईट येथील चालकाचा अहवाल कोरोना पाँझिटिव्ह आल्याने मुंबईहुन गावी आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. चास (ता खेड ) येथील पापळवाडीचे ३ व्यक्तीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्ताची संख्या १९ पोहचली आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी सांगितले. तालुक्यात गाव,वाड्या वस्त्या,परीसरात कडक निर्बंध आणि नियमाची अमलबजावणी न करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत गय करण्यात येऊ नये असे सांगण्यात आले. तरीही बफर झोन क्षेत्रातील सर्वच दुकाने नियमांना पायदळी तुडवत सुरु आहे..सुरक्षित अंतर ठेवण्याच्या नियमाचा फज्जा उडाल्याचे दिसत आहे.

खेड तालुक्यात मुंबईहून आलेल्या नागरिकांमुळे कोरोनाचे प्रादुर्भाव वाढला आहे.बाहेरून येत असलेल्या सर्व व्यक्तींचे घरातच विलगीकरण न करता प्रशासनाने संस्थात्मक विलगीकरण केले तर निश्चितच स्थानिकांना होणारा संसर्ग रोखता येईल व कोरोना आटोक्यात आणणे शक्य होईल असे नागरिकांचे म्हणणे आहे

Web Title: Corona virus : 4 more corona victims in Khed taluka today; The number of patients reached 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.