Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी दिवसभरात ३४६ तर पिंपरीत २८० जण कोरोनामुक्त  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 08:14 PM2020-12-04T20:14:55+5:302020-12-04T20:16:12+5:30

शहरातील सक्रिय रूग्णांची संख्या ५ हजार ३८० झाली आहे.   

Corona virus: 346 people in Pune and 280 in Pimpri patients corona free on Friday | Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी दिवसभरात ३४६ तर पिंपरीत २८० जण कोरोनामुक्त  

Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी दिवसभरात ३४६ तर पिंपरीत २८० जण कोरोनामुक्त  

Next
ठळक मुद्देउपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ४२९ जणांची प्रकृती चिंताजनक

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शुक्रवारी दिवसभरात ३६६ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या ३४६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ४२९ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ५ हजार ३८० झाली आहे.   
     उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ४२९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २५४ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १७५ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, १ हजार १५५ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ४ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ४८२ झाली आहे.
 दिवसभरात एकूण ३४६ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ६१ हजार ५५६ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ७१ हजार ४१८ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ५ हजार ३८० झाली आहे.   
-------------   
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ६६३ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ८ लाख ३३ हजार ७३० रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

.....................

पिंपरीत २८० जण कोरोनामुक्त..  

पिंपरी : औद्योगिकनगरीत कोरोनाने सात जणांचा बळी गेला आहे. अडीचशेच्या वर गेलेली पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आली आहे. तर २८० जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवाळीनंतर वाढलेला कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होऊ लागला आहे. महापालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयात ३ हजार २३७ जणांना दाखल करण्यात आले होते. दाखल रुग्णांच्या घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्हीमध्ये पाठविण्यात आले आहेत. त्यात ३ हजार ३८० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार २८ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे दाखल रुग्णांची संख्या ८५४ वर गेली आहे. तर एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९३ हजार ८८ वर गेली आहे.
......
३३६७ जणांना डिस्चार्ज
सलग तीन दिवसांपासून कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरातील २८० जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे एकूण संख्या ८९ हजार ५११ वर गेली आहे. कोरोनाने आज शहरातील सात आणि शहराबाहेरील दोन अशा नऊ जणांचा बळी घेतला आहे

Web Title: Corona virus: 346 people in Pune and 280 in Pimpri patients corona free on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.