Corona virus : 340 new corona affected patient increased in the pune district on Wednesday, 11 people died | Corona virus : पुणे जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ३४० नवीन कोरोनाबधित, ११ जणांचा मृत्यू

Corona virus : पुणे जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ३४० नवीन कोरोनाबधित, ११ जणांचा मृत्यू

पुणे : पुणे जिल्ह्यात बुधवार (दि.३) रोजी एका दिवसांत ३४० नवीन कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची भर पडली.तर ११ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे आज अखेर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची ८ हजार ४७४ ऐवढी झाली असून, एकूण बळीची संख्या ३७८ वर जाऊन पोहचली आहे. 
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवारी निसर्ग चक्रीवादळाबरोबर कोरोनाच्या रूग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांत एका दिवसांत दरोरोज २५०-३०० च्या पट्टीत रुग्ण वाढत आहेत. याच बरोबर मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. सध्या जिल्ह्याती कोरोनाचा मृत्यू दर पाच टक्क्यांपर्यत वाढला आहे. ही बाबा जिल्ह्यासाठी गंभीर असून, जिल्हा प्रशासन हा मृत्यू दर कमी करण्यासाठी डाॅक्टरांच्या मागे लागले आहे. त्यासाठी विविध उपाययोजना देखील केल्या जात आहेत. परंतु दरोरोज दहाच्या पट्टीत मृत्यू होत असल्याचे चिंतेचे वातावरण आहे. 
------
एकूण बाधित रूग्ण : ८४७४
पुणे शहर : ७१३४
पिंपरी चिंचवड : ५८७
कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : ७५०
मृत्यु : ३७८

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona virus : 340 new corona affected patient increased in the pune district on Wednesday, 11 people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.